Search LEHREN

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन, शोले मधील कालिया ही अजरामर भूमिका

शोले, अशी ही बनवाबनवी आणि ३०० हुन अधिक चित्रपटात काम करणाऱ्या विजू खोटे आज कालवश झाले आहेत.

30th September 2019 | 03:23 PM (IST)
3 views | 3+ Shares

मराठी आणि हिंदी चित्रपटश्रुष्टीत अनेक गाजलेल्या भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. गावदेवीतल्या आपल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

गेले काही दिवस त्यांची प्रकृती गंभीर होती आणि उपचारही सुरु होते. विजू खोटे यांच्या जाण्याने फक्त मराठी नाही तर बॉलीवूड मध्ये सुद्धा शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने एक उत्कृष्ट अभिनेता गमावल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. सुरुवातीला लहान लहान भूमिकांमध्ये काम करून त्यांनी आपली वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली.

 

'सरदार मैने आपका नमक खाया है' हा शोले चित्रपटातील त्यांचा डायलॉग कोणी विसरणेच शक्य नाही. याशिवाय अंदाज अपना अपना मधील रॉबर्ट, अशी ही बनवाबनवी मधील बळी अश्या ३०० हुन अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांची उणीव आम्हाला नेहमीच भासत राहील.

30th September 2019 | 03:23 PM (IST)
3 views | 3+ Shares
×
×