प्रजासत्ताक दिन २०१९: या ४ ऑनलाइन शॉपिंग साईट्स वर घसघशीत सूट

भारताच्या प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधून ई कॉमर्स कंपन्यांनी भन्नाट ऑफर्स बाजारात आणल्या आहेत. पहा कोणत्या ४ वेबसाइट्सवर आहे घसघशीत सूट.

प्रजासत्ताक दिन २०१९: या ४ ऑनलाइन शॉपिंग साईट्स वर घसघशीत सूट प्रजासत्ताक दिन २०१९: या ४ ऑनलाइन शॉपिंग साईट्स वर घसघशीत सूट Source : Press


शॉपिंग म्हंटलं की सर्वांचीच कळी खुलते. शॉपिंग कोणाला करायला आवडत नाही? आजकालच्या धक्का धक्कीच्या जीवनात ग्राहकांच्या मदतीला येतात त्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्स. एक ना अनेक शॉपिंग वेबसाइट्सने बाजारात आपला डेरा जमवला असून, मुबलक किमतीत ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचवण्याचं काम या वेबसाइट्स सतत करत असतात.

भारताच्या प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधून ई कॉमर्स कंपन्यांनी भन्नाट ऑफर्स बाजारात आणल्या आहेत. फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि अश्या बऱ्याच वेबसाइट्सने रिपब्लिक डे सेल २०१९ या अंतर्गत प्रेक्षकांना घसघशीत सूट आणि सवलती दिल्या आहेत.

पहा कोणत्या ४ वेबसाइट्सवर आहे घसघशीत सूट.

१. पेटीएम मॉल: पेटीएम मॉलचा सेल २१ जानेवारी ते २६ जानेवारी पर्यंत असून, या सेल मध्ये ग्राहकांना जवळ जवळ सर्वच वस्तूंवर भरगोस सूट मिळणार आहे. कॅशबॅकवर सवलती तसेच विना व्याज ईएमआय अश्या अनेक सेवा उपलब्ध आहेत.

२. बिग बझार: ‘सबसे सस्ते ५ दिन' असे बिग बझारच्या सेलचे नाव असून हा सेल २३ ते २७ जानेवारीदरम्यान देशातील सर्व बिग बाजार दालनात मिळेल. रुपेकार्डने ५०० रुपयांच्या खरेदीवर ७ टक्के अधिक डिस्काऊंट तसेच ५ हजारांच्या खरेदीवर १० टक्के सूट दिली जाणार आहे.

३. फ्लिपकार्ट: जे लोक फ्लिपकार्ट वर नेहमी शॉपिंग करतात त्यांना माहित असेल की २० जानेवारीपासून फ्लिपकार्ट च्या सेल ची सुरुवात झाली आहे. हा सेल २ दिवस असून २२ जानेवारीपर्यंत ग्राहकांना याचा लाभ घेता येईल. मोबाइल फोन, लॅपटॉप आणि टीव्हीच्या ब्लॉकबस्टर सूट असून हे डील्स ग्राहकांना खुश करणार हे नक्की.

४. अमेझॉन: अमेझॉन वेबसाइट प्रचंड लोकप्रिय आहे. या वेबसाइट वर २० ते २३ जानेवारी दरम्यान सेल होता. महिलांचे कपडे, पुरुषांचे कपडे, मोबाइल, रोजच्या अश्या एक ना अनेक वस्तूंवर भरगोस सूट होती. पुरुषांच्या २५००० पेक्षा जास्त गोष्टींवर तर महिलांच्या २०००० पेक्षा जास्त वस्तूंवर हि सूट मिळाली. शाओमी रेडमी Y2, हुआई नोवा 3i, ओनर 8X, व्हीवो V9 आणि इतर वस्तू जसे की लॅपटॉप, टीव्ही, हार्डड्राइव्ह वर ६० टक्के पर्यंत सूट होती.


Download The Lehren App For Latest & More News, Gossips And Videos.

You may also like