Lehren

'बापजन्म' चा ट्रेलर प्रदर्शित, आयुष्यात केलेल्या चुका सुधारण्याचा बाबांचा प्रयत्न

अभिनेता 'सचिन खेडेकर'ची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. एका वडिलांनी आयुष्यात केलेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न ‘बापजन्म’ सिनेमातून केला आहे.

बापजन्म 'बापजन्म' चा ट्रेलर प्रदर्शित, आयुष्यात केलेल्या चुका सुधारण्याचा बाबांचा प्रयत्न Source : Press

सध्या पालक आणि मुलांमधला विसंवाद वाढत चालला आहे. ऑफिस-घरगुती कामांमध्ये व्यस्त असलेल्या आई-वडिलांना आपल्या मुलांना द्यायला फारसा वेळ मिळत नाही. अशात कधी रागाच्या भरात पालकांकडून काही चुका होवून जातात. हे शल्य आयुष्यभर राहत. प्रत्येक वडिलांना आपली मुले मागत असलेली वस्तू त्यांना घेवून द्यायची असते. मात्र, अनेकदा त्यांना जमत नाही. पण मुलांना ते समजत नाही. यातून गैरसमज निर्माण होतात आणि नात्यात दूरावा येतो. नेमक्या याच संवेदनशील मुद्द्यावर बोट ठेवत दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी 'बापजन्म' हा सिनेमा घेवून आला आहे.

अभिनेता 'सचिन खेडेकर'ची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. याआधी टीझरमधून बाबांच्या डायरीचं एक पान उलगडले होते. या टीझरची सुरुवात रेडिओच्या गाण्यानं झाली होती. आणि आता प्रदर्शित झालेल्या ट्रेलरची सुरुवातही एका गाण्यानेच होताना दिसत आहे. संसाराचा गाडा रेटताना, मुलांची जबाबदारी पार पाडताना अनेकदा वडिलांकडूनही नकळत चुका होतात. त्या चुका सुधारण्याचा निश्चय भास्कर पंडीत करतात आणि एका मिशनवर निघतात. हे मिशन काय आहे याचे उत्तर आपल्याला २९ सप्टेंबरला हा सिनेमा पाहिल्यावरच समजेल. या सिनेमात 'दिल दोस्ती दुनियादारी'तील 'आशू' म्हणजेच 'पुष्पराज चिरपूटकर'ही दिसत आहे.

निपुणने आपल्या सिनेमाचे काही पोस्टर हटके टॅगलाईनसह फेसबुकवर पोस्ट केले आहेत. यातील एका पोस्टमध्ये त्याने खेळण्यातल्या कारच्या फोटोला - 'एका बापाला मुलासाठी महाग असे काहीच नसते. कधी ती वस्तू घेणे जमते. कधी नाही इतकेच!' ही दिलेली कॅप्शन मनाला भिडणारी आहे. एका दिवसात या ट्रेलरला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. आता ट्रेलरही सगळ्यांच्या पसंतीला उतरला असल्यामुळे या सिनेमाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


You may also like