'गुलाबजाम' चा ट्रेलर रिलीज, सोनाली- सिद्धार्थचे १६ फेब्रुवारीला पंगतीला येण्याचे आमंत्रण

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या मुख्य भूमिका असलेला फूडी सिनेमा 'गुलाबजाम' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमाचा ट्रेलर अर्थातच फूडी आहे.

सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर 'गुलाबजाम' चा ट्रेलर रिलीज, सोनाली- सिद्धार्थचे १६ फेब्रुवारीला पंगतीला येण्याचे आमंत्रण Source : Press


अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या मुख्य भूमिका असलेला फूडी सिनेमा 'गुलाबजाम' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. सोनाली कुलकर्णीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हीडिओ शेअर केला आहे. सोनालीने या व्हीडिओला - ‘पंगतीची तयारी बघण्यासाठी आज उघडलीय स्वयंपाकघराची खिडकी. बघा कशी चाललीय तयारी आणि १६ फेब्रुवारीला पंगतीला नक्की या वाट बघतोय!' अशी हटके कॅप्शन दिली आहे.


गुलाबजाम चा ट्रेलर रिलीज


आदित्य म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर लंडनहून खासकरुन महाराष्ट्रीय पदार्थ शिकण्यासाठी भारतात येतो. आदित्य एक नंबर खवय्या आहे. त्याला भारतीय जेवणाची क्रेझ आहे. त्यातही खासकरुन महाराष्ट्रीन जेवणाच्या तो प्रेमात आहे आणि म्हणूनच त्याला स्वत: चे एक रेस्टॉरंट सुरु करायचे आहे. पण याकडे तो बिझनेस म्हणून नाही पाहात तर त्यामागे एक भावनिक किनार आहे. यासाठी त्याला स्वत: शेफ व्हायचे आहे. उत्तम स्वयंपाक बनवायचा आहे. आणि म्हणूनच तो एका शेफच्या शोधात आहे. यावेळी त्याला खायला मिळतात ते टेस्टी गुलाबजाम. त्या गुलाबजामची चव जीभेवर रेंगाळताना आदित्यच्या मनात त्याच्या आईच्या आठवणी दाटून येतात. आणि मग ते गुलाबजाम तयार करणाऱ्याला राधाला गुरु बनवण्याचा तो निश्चिय करतो. पण, स्वत:ला बच्चन समजणारी म्हणजेच अंग्री यंग वुमन राधा त्याचा प्रस्ताव धुडकावून लावते. मग राधा आदित्यला स्वयंपाक शिकवणार का? आदित्य, राधासारखा स्वयंपाक तयार करु शकतो का? हे सिनेमा पाहिल्यावरच कळेल.


गुलाबजाम चा ट्रेलर रिलीज


सिनेमाचा ट्रेलर अर्थातच फूडी आहे. पण ट्रेलरमध्ये आपल्याला कॉमेडी, इमोशनल ड्रामा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका शेफला करावी लागणारी मेहनत हे सगळे पाहायला मिळते. कॉमेडीची टाईमिंग परफेक्ट जुळली आहे. सोनाली राधाच्या भूमिकेत तर सिद्धार्थ आदित्यच्या भूमिकेत योग्य वाटतो. सिनेमाचा ट्रेलर उत्सुकता वाढवणारा आहे. एकंदरीत या फूडी सिनेमाची भट्टी जमली आहे.