'कट्यार' नंतर सुबोधचा नवा सिनेमा लवकरच

'कट्यार' नंतर अभिनेता सुबोध भावे आता नवा सिनेमा घवून येत आहे. या सिनेमाचे कथावाचन नुकतेच पार पडले. हा फोटो सुबोधने फेसबुकवर शेअर केला आहे.

कट्यार काळजात घुसली,सुबोध भावे 'कट्यार' नंतर सुबोधचा नवा सिनेमा लवकरच Source : Press

'कट्यार काळजात घुसली' हा मराठी सिनेमा कोणी विसरणे शक्यच नाही. 'कट्यार'ने मराठी सिनेमाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. वेगळे कथानक असलेल्या या संगीतमय सिनेमाने मराठी सिनेमाला एका वेगळ्या पातळीवर नेवून ठेवले.

सचिन पिळगावकर, सुबोध भावे, अमृता खानविलकर यांचा दमदार अभिनय तसेच शंकर महादेवन, साक्षी तन्वर यांची मराठी सिनेमात एन्ट्री या सर्व गोष्टी या सिनेमात एकाच वेळी घडून आल्या होत्या. यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमातून अभिनेता सुबोध भावेने दिग्दर्शनात पाऊल टाकले. आणि तो यशस्वी ठरला. या सिनेमातील गाण्यासाठी गायक राहुल देशपांडेला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यानंतर सगळ्यांना सुबोधच्या नव्या सिनेमाची उत्सुकता लागली . पण २०१५ला प्रदर्शित झालेल्या या सिनेमानंतर सुबोधचा नवा सिनेमा आला नाही. आता तुमची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

अभिनेता सुबोध भावे पुन्हा एक सिनेमा दिग्दर्शित करणार आहे. यासंदर्भात सुबोधने एक फोटो आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोत सुबोधसह आणखी काहीजण दिसत आहेत. हे सर्वजण कामात व्यस्त असलेले दिसत आहेत. सुबोधने या फोटोला, - '२०११ पासून याला सुरुवात झाली. तब्बल सहा वर्षांनंतर अखेर आज संपूर्ण टीमसमोर या कथेचे वाचन झाले. एक अस्सल भारतीय कथा. कट्यारनंतर माझा हा दुसरा सिनेमा.' अशी कॅप्शन दिली आहे.

सुबोध भावे

या पोस्टमुळे सुबोध आता नवा सिनेमा घेवून येत आहे हे एव्हाना निश्चित झाले आहे. पण आत्ताशी या सिनेमाच्या कथेचे वाचन झाले आहे. त्यामुळे आत्तापासूनच या सिनेमात कोणता विषय हाताळण्यात येईल?, या सिनेमात कोणते कलाकार झळकतील?, कट्यार सारखाच हा सिनेमाही संगीतप्रधान असणार का? याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

You may also like