२०१७ मध्ये हे प्रसिद्ध कलाकार अडकले विवाहबंधनात

२०१७मध्ये मनवा नाईक, क्रांती रेडकरसह मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री या लग्नबंधनात अडकल्या. यापैकी काहींनी अचानक विवाह करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. तर काहींचे विवाह हे इतर काही कारणांमुळे चर्चेचा विषय ठरले.

प्रसिद्ध कलाकार २०१७ मध्ये हे प्रसिद्ध कलाकार अडकले विवाहबंधनात Source : Press

सध्या मराठी सिने-इंडस्ट्रीत लग्नसराईचे वारे वाहत आहेत. २०१७मध्ये मराठीतील अनेक सिलेब्रिटी विवाहबंधनात अडकलेत. यातील सर्वात चर्चित पाच लग्नसोहळ्यांवर एक नजर टाकूयात.

1. शशांक केतकर - प्रियांका ढवळे - ४ डिसेंबर २०१७
'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतून घराघरात पोहोचलेला 'श्री' म्हणजेच शशांक केतकर पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकला. ४ डिसेंबरला पुण्यात शशांक केतकर आणि त्याची मैत्रिण प्रियांका ढवळे यांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नाची तारिख शशांकने जाहीर केली नव्हती .त्यामुळे अचानक लग्नाचे फोटो पाहून त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला. शशांकचे याआधी 'होणार सून मी या घरची' मालिकेत त्याच्या पत्नीची भूमिका करणाऱ्या तेजश्री प्रधानसोबत पहिले लग्न झाले होते. मात्र, लग्नानंतर वर्षभरातच या दोघांचा घटस्फोट झाला
 शशांक केतकर - प्रियांका ढवळे

२. सागरिका घाटगे-झहीर खान - २३ नोव्हेंबर २०१७
युवराज सिंगच्या रिसेप्शनमध्ये 'चक दे गर्ल' सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खान यांना एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या अफेर्सच्या चर्चांना सुरुवात झाली होती. अखेर २३ नोव्हेंबर २०१७ या दोघांनी लग्न केले. तर २७ नोव्हेंबर ग्रँड रिसेप्शन पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीला विराट कोहली-अनुष्का शर्मापासून अनेक बॉलिवूड स्टार्ससह क्रिकेटर्सने हजेरी लावली.
सागरिका घाटगे-झहीर खान

३. प्रार्थना बेहरे-अभिषेक जावकर - १४ नोव्हेंबर २०१७
'कॉफी आणि बरचं काही' मधली जाई म्हणजे अभिनेत्री प्रार्थना बेहरे, दिग्दर्शक-निर्माता अभिषेक जावकरसोबत १६ नोव्हेंबर २०१७ ला बोहल्यावर चढली. गोव्यात या दोघांचा डेस्टिनेशन वेडिंग सोहळा पार पडला. लग्नाच्या सर्व विधी आटोपल्यानंतर संध्याकाळी या जोडप्याने कॉकटेल पार्टीचे आयोजन केले होते. या सोहळ्याला मराठी सिने इंडस्ट्रीतील कलाकार वैभव तत्ववादी, सोनाली कुलकर्णी, स्वप्नाली पाटील, विराजस कुलकर्णी, स्वप्ना वाघमारे यांनी हजेरी लावली.
प्रार्थना बेहरे-अभिषेक जावकर

४. अमेय वाघ-साजिरी देशपांडे - २ जुलै २०१७
फास्टर फेणे तसेच दिल दोस्ती दुनियादारीमधून सगळ्यांची मनं जिंकणारा अमेय वाघ लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला होता. अमेयने साजिरी देशपांडेसोबत विवाह करत सगळ्यांनाच सुखद धक्का दिला. पुण्यात अमेय-साजिरीचा विवाह पार पडला. साजिरी अमेयची १३ वर्षांपासूनची मैत्रिण आहे.
अमेय वाघ-साजिरी देशपांडे

5. पियुष रानडे-मयुरी वाघ - 1 फेब्रुवारी 2017
मयुरी वाघने 'अस्मिता' या मालिकेत तिचा जोडीदार असलेला अभिनेता पियुष रानडेसोबत विवाह थाटला. झी मराठीवरील अस्मिता मालिकेत पियुष-मयुरीची जोडी जमली होती. ही जोडी प्रेक्षकांना इतकी आवडली की या जोडीने लग्न करावे अशा आग्रहाचे मेसेज-पत्र या दोघांना येत होते. यानंतर काम करता करता हे दोघे खरेच एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पियुषचे हे दुसरे लग्न आहे. 
पियुष रानडे-मयुरी वाघ