१५ एप्रिलपासून मराठी बिग बॉसला सुरुवात, महेश मांजरेकर बिग बॉसच्या भूमिकेत

दिग्दर्शक महेश मांजरेकर लवकरच बिग बॉस घेऊन येत आहेत. १५ एप्रिलपासून कलर्स मराठी या वाहिनीवर हा रिएलिटी शो आपल्याला पाहता येईल.

महेश मांजरेकर १५ एप्रिलपासून मराठी बिग बॉसला सुरुवात, महेश मांजरेकर बिग बॉसच्या भूमिकेत Source : Press


दिग्दर्शक महेश मांजरेकर लवकरच बिग बॉस घेऊन येत आहेत. गैरसमज करून घेवू नका. पुढच्या बिग बॉसमध्ये महेश मांजरेकर सलमानला रिप्लेस करणार नाहीत. तर मराठी बिग बॉस घेऊन येत आहेत. अंगुरी भाभी फेम शिल्पा शिंदेने हिंदी बिग बॉस जिंकल्यानंतर ही अधिकृत घोषणा करण्यात आली होती. हिंदी बिग बॉसमध्ये मराठी कलाकारांना मिळणारा प्रतिसाद बघता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच तेलगू तामिळ आणि कन्नडनंतर आता मराठीतसुद्धा बिग बॉस पाहता येईल. मराठीतील कलाकारांच्या पर्सनल लाईफ, लाईफस्टाईलबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. नेमके हेच हेरून बिग बॉस मराठी सुरु करण्यात येत आहे.

बिग बॉस मराठी येणार हे नक्की झाल्यावर नेमके बिग बॉसच्या भूमिकेत कोण दिसणार याची उत्सुकता सगळ्यांना होती. आता बिग बॉसच्या भूमिकेत आपल्याला महेश मांजरेकर पाहायला मिळतील हे नक्की झाले आहे. नावांच्या यादीत रितेश देशमुखचे नाव सर्वात वरती होते. पण ही संधी महेश मांजरेकर यांना मिळाली आहे. १५ एप्रिलपासून कलर्स मराठी या वाहिनीवर हा रिएलिटी शो आपल्याला पाहता येईल. बिग बॉस कोण असणार याची माहिती मिळाली असली तरी या पहिल्यांदाच मराठी बिग बॉसच्या घरात कोणते कलाकार बंद होणार आहेत. त्यांची नावे कळू शकलेली नाहीत. बिग बॉसच्या घरात आपल्याला कलाकारांसोबतच राजकारणी, मॉडेल्सस साधूसुद्धा पाहायला मिळतात. मराठी बिग बॉसमध्येही हे सहभागी होणार का? या बिग बॉस ची थीम काय असेल?, हिंदी प्रमाणे या बिग बॉसमध्येही कॉमनर झळकणार का? मराठीत बिग बॉस कशा सूचना देतील? या बिग बॉसचा सेट नेमका कुठे आहे? आणि तो कसा असेल? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. १५ एप्रिलपासून हा शो सुरु होणार असला तरी या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला याच महिन्या अखेरीस मिळणार आहेत.