हे कलाकार झळकणार मराठी बिग बॉसमध्ये?

बिग बॉस मराठी ७ एप्रिलपासून सुरु होत आहे. या शोमध्ये कोणते कलाकार झळकणार याची चर्चा सुरु आहे.

हे कलाकार झळकणार मराठी बिग बॉसमध्ये? Source : Press

बिग बॉस मराठी ७ एप्रिलपासून सुरु होत आहे. हा रियलिटी शो सुरु होण्याआधीपासूनच चर्चेत आहे. यामध्ये बिग बॉसच्या घरात कोण एन्ट्री घेणार ? याची सर्वात जास्त चर्चा आहे. ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या बिग बॉस मराठीत एन्ट्री घेणार असल्याची माहिती एका वृत्तपत्राने दिली आहे. त्यांच्यासोबत आपल्याला बिग बॉसमध्ये क्लासममेट फेम सुशांत शेलार, संतोष जुवेकर आणि अक्कासाहेबांची लाडकी सून जुई गडकरी हे कलाकार पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यांच्याव्यतिरिक्त मेघा धाडे, राजेश शृंगारपुरे, आस्ताद काळे, पुष्कर जोग हे कलाकारही बिग बॉसच्या पहिल्या पर्वात झळकण्याची शक्यता आहे. महेश मांजरेकर या शोचे होस्ट आहेत.

यांनी बिग बॉस मराठीची ऑफर नाकारली
अनेकांना बिग बॉसकडून ऑफर आल्याच्या बातम्या होत्या. या चर्चेत सर्वात वर नाव मानसी नाईकचे होते. पण मानसी नाईक बिग बॉमध्ये सहभागी होत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय आणखी काही कलाकारांची नावे चर्चेत होती. यापैकी ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळीने बिग बॉसमध्ये येण्यास नकार दिल्याचे कळते आहे. तर अभिनेत्री रेशम टिपणीसनेसुद्धा बिग बॉसला नकार कळवला आहे.

असा असेल बिग बॉस मराठीचा सेट
बिग बॉस हिंदी ११चा सेटचे मराठी बिग बॉससाठी वापरण्यात येणार आहे अशी माहिती मिळते आहे. हा सेट लोणावळ्याला आहे. आणि याच ठिकाणी बिग बॉस मराठी होईल. बिग बॉस सिझन ११ साठी या घराचा संपूर्ण लूक हा बदलून टाकण्यात आला होता. हे घर खूपच आकर्षक करण्यात आले होते. याच घरात आता मराठी बिग बॉस रंगेल. या घरात एक किचन कॉमन बेडरूम, चार टॉयलेट बाथरुम, गार्डन एरिया, स्विमिंग पूल , जीम आणि एक्टिव्हीटी एरिया आहे. याशिवाय कन्फेशन रुम , डायनिंग रुम एरिया ही असेल.

घरात स्पर्धकांना टीव्ही, मोबाईल, इंटरनेट,घड्याळ, पेपर -पेन अशा कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळणार नाहीत. बिग बॉस हिंदीचा सेट याआधीही बिग बॉस तेलगू आणि कन्नडसाठी वापरण्यात आला होता. पण या शोची थीम काय असेल आणि शोमध्ये काय काय घडणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे.