ही अभिनेत्री होती अभिनेता आस्ताद काळेची गर्लफ्रेण्ड!

बिग बॉसच्या घरात अभिनेता आस्ताद काळेने एका टास्कदरम्यान त्याच्या गर्लफ्रेण्ड प्राचीचा उल्लेख केला. आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.

आस्ताद काळे ही अभिनेत्री होती अभिनेता आस्ताद काळेची गर्लफ्रेण्ड Source : Press

बिग बॉसच्या घरात आता एकमेकांच्या स्वभावासोबतच त्यांचे व्यक्तिगत आयुष्य सुद्धा शेअर केले जात आहे. बिग बॉसच्या घरातील पुढचं पाऊल,सरस्वती या मालिमुळे घराघरात पोहचलेल्या आस्ताद काळेचे अनेक फिमेल फॅन्स आहेत.  

आस्ताद कधी लग्न करणार आणि कोणाशी करणार याची सगळ्यांना उस्तुकता आहे. आस्तादने याचसंदर्भातला एक धक्कादायक खुलासा बिग बॉसच्या घरात केला.
आस्तादने एका टास्कदरम्यान नाना पाटेकरांबद्दलचा एक किस्सा सांगताना, त्याच्या गर्लफ्रेण्ड प्राचीचा उल्लेख केला. 

आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. आस्तादने आत्तापर्यंत पुढचं पाऊल, सरस्वती सारख्या अनेक हीट मालिकांमध्ये काम केले आहे. पण त्याचे नाव कधीही त्याच्या को-स्टार सोबत जोडले गेले नाही. आस्ताद सध्या ३५ वर्षाचा असून तो अजूनही सिंगल आहे. 

तो अजून सिंगल का याचे उत्तर यावेळी मिळाले आहे. आस्ताद करियर सुरुवातीच्या दिवसांमध्ये एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता. ही अभिनेत्री होती प्राची माटे. प्राचीला आपण चार दिवस सासूचे आणि अग्निहोत्र या मराठी मालिकांमध्ये पाहिले आहे. 

Prachi Mate

आस्तादप्रमाणेच प्राचीही त्याच्या प्रेमात होती. दोघांनी अनेक स्वप्न पाहिली होती. पण अगदी वयाच्या २३ व्या वर्षी एका दुर्लभ कैन्सरमुळे प्राचीने जगाचा निरोप घेतला. या धक्क्यातून आस्तादला सावरण्यासाठी बराच काळ गेला. 

प्राचीच्या शेवटच्या दिवसांमध्ये तो तिच्यासोबतच हॉस्पिटलमध्ये असायचा. त्यानंतर इतके वर्ष उलटले पण आस्ताद अजूनही प्राचीला विसरू शकलेला नाही. आणि म्हणूनच तो आजही सिंगल आहे.

You may also like