Lehren

हा अभिनेता साकारणार संभाजी महाराजांची भूमिका

झी मराठी संभाजी महाराजांवर आधारित एक मालिका घेवून येत आहे. या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका अमोल कोल्हे साकारणार आहे. तर जिजामाता यांची भूमिका अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर तर सईबाईंची भूमिका पूर्वा गोखले साकारणार आहे.

संभाजी महाराज हा अभिनेता साकारणार संभाजी महाराजांची भूमिका Source : Press

आत्तापर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मी बाई, पेशवा बाजीराव अशा अनेक ऐतिहासिक व्यक्तिरेखा छोट्या पडद्यावर जिवंत होताना पाहिल्या आहेत. अशीच एक कायम दुर्लक्षित आणि वाद विवादांमध्ये अडकलेली ऐतिहासिक व्यक्तिरेखा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आत्ताच्या पिढीला संभाजी महाराजांचा पराक्रम कमी वाद विवादच जास्त माहित आहेत. आणि म्हणूनच हे गैरसमज दूर करण्यासाठी तसेच छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम सर्वांना कळावा यासाठी झी मराठी खास शिवशंभू संभाजी महाराजांवर आधारित एक मालिका घेवून येत आहे.                                             

आधीपासूनच या मालिकेविषयी सगळ्यांनाच उत्सुकता होती. या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यातच या मालिकेचे पहिले पोस्टर रिलीज झाले. पण या पोस्टरमधून संभाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार हे समजू शकले नाही. मालिकेच्या प्रोमोतही हा चेहरा दाखवला गेला नाही. त्यामुळे ही उत्सुकता ताणली गेली. अखेर या सगळ्या प्रश्नांची उत्तर या मालिकेच्या ग्रँड लाँच सोहळ्यात मिळाली. या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका अमोल कोल्हे साकारणार आहे. याआधी अमोल कोल्हेने मालिका, रंगभूमिवर शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. 

महत्त्वाचे म्हणजे या मालिकेत हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेते अमित बहल हे देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. अमित बहल औरंगजेबाची भूमिका साकारणार आहेत. मालिकेच्या पहिल्या प्रोमोत त्यांची झलक दाखवण्यात आली आहे. या प्रोमोत औरंगजेब जीवनाच्या अखेरच्या घटका मोजत असलेला दाखवण्यात आला आहे. यावेळी - 'संभाजीराजेंसारखा पुत्र असता तर त्याच्या खांद्यावर सगळी धुरा सोपवून मी जगाचा निरोप घेतला असता.' हे शब्द त्यांच्या तोंडून निघतात. या मालिकेत जिजामाता यांची भूमिका अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर तर सईबाईंची भूमिका पूर्वा गोखले साकारणार आहे. रात्री ९ वाजता या मालिकेचे प्रसारण होणार आहे. त्यामुळे 'काहे दिया परदेस' ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.  


You may also like