स्वप्निल जोशीच्या अपकमिंग सिनेमा 'मी पण सचिन' चे पोस्टर रिलीज

चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. स्वप्निलच्या 'मी पण सचिन' या अपकमिंग सिनेमाचा पोस्टर रिलीज करण्यात आला आहे.

स्वप्निल जोशी,Swapnil Joshi स्वप्निल जोशीच्या अपकमिंग सिनेमा 'मी पण सचिन' चे पोस्टर रिलीज Source : Press


चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. स्वप्निलच्या अपकमिंग सिनेमाचा पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. 'मी पण सचिन' असे या सिनेमाचे नाव आहे. पोस्टरवर स्पोर्ट्स ग्लोज घातलेला स्वप्निल दिसत आहे. स्वप्निलसोबत ग्राऊंडमध्ये उभा असलेला सचिन तेंडुलकर पण दिसतोय. स्वप्निलने स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटवर हे पोस्टर पोस्ट केले असून या पोस्टला त्याने- 'तुमच्या आमच्या सर्वांमध्ये एक सचिन आहे, त्यातल्याच एक ! मी पण सचिन' अशी हटके कॅप्शन दिली आहे.सिनेमाच्या नावावरुन हा सिनेमा क्रिकेट फॅन्ससाठी आणि खासकरून सचिनच्या फॅन्ससाठी असणार हे वेगळं सांगायची गरज नाही. पोस्टर पाहून स्वप्निलसोबत कोणती अभिनेत्री झळकणार ?, सिनेमात सचिनची झलक पाहायला मिळणार का ? असे प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेत. आता सिनेमाचा ट्रेलर पाहूनच या प्रश्नांची उत्तर मिळतील.या सिनेमासोबतच स्वप्निल एक नवा शो घेवून छोट्या पडद्यावर आला आहे. 'नंबर १ यारी' या शोमध्ये स्वप्निल, मराठी सिनेसृष्टीतील घनिष्ठ मैत्री असलेल्या दोघांसोबत मनमुराद गप्पा मारताना दिसेल. याशिवाय स्वप्निल प्रोड्युसर आणि अभिनेता या दोन्ही भूमिका वठवताना दिसतो आहे. पण यातूनही तो आपल्या कुटूंबासाठी वेळ देताना दिसत आहे.


नुकताच स्वप्निल दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. स्वप्नीलने त्याच्या मुलाचे नाव राघव ठेवले आहे. याआधी स्वप्निल आणि लिना या दाम्पत्याला मायरा नावाची पहिली मुलगी असून, ती आता दीड वर्षाची झाली आहे. स्वप्निल आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून मायरा आणि राघव यांच्यासोबत वेळ घालवतो आहे.


You may also like