Lehren

'विकता का उत्तर' च्या सेटवर साजरी झाली दिवाळी

रितेश देशमुख पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर 'विकता का उत्तर' या गेम शोच्या माध्यमातून पदार्पण करतो आहे। महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना सेलिब्रिटी बणावणाऱ्या या गेम शोच्या सेटवर दिवाळी चांगलीच गाजते आहे.

रितेश देशमुख 'विकता का उत्तर' च्या सेटवर साजरी झाली दिवाळी Source : Press
मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात अनेक गेम शो आले, मात्र विकता का उत्तर हा शो मागील सर्व शोपेक्षा नक्कीच अनोखा म्हणावा लागेल. जिंकण्यासाठी भाव करावा लागणं या विशेष संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाची दिवाळी देखील अशीच अनोख्या पद्धतीने साजरी झालीय. दिवाळीच्या खास भागात स्टार प्रवाहाच्या कुटुंबासोबत दिमाखात दिवाळी साजरी करण्यात आली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्यांना सेलिब्रिटी बनवणारा हा गेम शो असल्यामुळे यंदाची दिवाळी 'विकता का उत्तर' च्या सेटवर चांगलीच गाजतेय. संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण असलेल्या या सणाच्या मुहूर्तावर रितेश देशमुखने आपल्या खुमासदार सूत्रसंचालनाच्या आधारे स्पर्धकांना दिवाळीची विशेष भेट देखील दिली. या शोचा हा आठवडा दिवाळी विशेष असणार आहे. शुक्रवारच्या या दिवाळी विशेष भागात ''विकता का उत्तर' च्या सेटवर स्टार प्रवाहांच्या ताऱ्यांची झगमगाट पाहायला मिळेल. तर शनिवारी आणि रविवारी रितेश स्पर्धकांसोबत आणि ट्रेडर्ससोबतदिवाळी साजरी करणार आहे.