लग्नाआधीच आई झाली होती, बिग बॉसची ही स्पर्धक

बिग बॉसची स्पर्धक मेघा धाडेच्या करियर आणि व्यक्तिगत आयुष्याबद्दल काही गोष्टी जाणून घेवूयात.

बिग बॉस लग्नाआधीच आई झाली होती, बिग बॉसची ही स्पर्धक Source : Press

मराठी बिग बॉसच्या घरात अभिनेत्री मेघा धाडेला प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा मिळतो आहे. मेघाचा टास्कमधला परफॉर्मन्स, मेघाचे स्पटपणे बोलणे हे सगळेच प्रेक्षकांच्या भावते आहे. घराबाहेर तिचे फॅन-फॉलोव्हर्स वाढले आहेत.


तिच्या चाहत्यांना मेघाबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आहे. बिग बॉसच्या घरात मेघा नेहमीच आपल्या नवऱ्याबद्दल बोलताना दिसते. आज आपण तिच्या करियर आणि व्यक्तिगत आयुष्याबद्दल आणखी काही गोष्टी जाणून घेवूयात.


मेघा, लग्नाच्या आधीच आई झाली होती. तुम्हाला वाचून धक्का बसेल पण हे खरे आहे. एका मुलाखतीमध्ये तिने स्वत:च ही गोष्ट सांगितली होती. तिने सांगितले होते की, 'लहान वयात काही चुका माझ्याकडून घडल्या आणि मी अतिशय लहान वयात गरोदर झाले.' 


याकाळातच मेघाच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. यावेळी मेघाला तिच्या घरातल्यांनी वडिलांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले होते. मेघाचे पहिले लग्न टिकले नाही. यानंतर मेघाचे काही वर्षांपूर्वीच दुसरे लग्न केले आहे. 


तिच्या नवऱ्याचेही हे दुसरे लग्न आहे. त्यांना एक पंधरा वर्षांचा मुलगा असून त्या मुलासोबत तिचे नाते एखाद्या मैत्रिणीसारखे आहे, असे मेघाने बिग बॉसच्या घरात सांगितले होते.


मेघाला आपण याआधी अनेक हिंदी मालिकांमध्ये पाहिले आहे. एकता कपूरची मालिका 'कसोटी जिंदगी की' मधून तिनं आपल्या करियरला सुरुवात केली. यानंतर ती 'किस देश मै है मेरा दिल' आणि 'कस्तुरी' या मालिकांमध्ये झळकली आहे. 


मेघाने 2012ला आलेल्या 'मॅटर' या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकले. मेघा अभिनेत्री आणि उत्तम डान्सरचं नाही तर निर्मातीसुद्धा आहे. कोरिओग्राफर गणेश आचार्य मेघाचा बेस्ट फ्रेण्ड आहे. मेघा त्याला राखी ब्रदर मानते.