Lehren

या प्रसिद्ध मालिकांनी २०१७ मध्ये घेतला निरोप

२०१७ मध्ये कल्याणी, अक्कासाहेब, शिव –गौरी अशा अनेक व्यक्तिरेखांनी आपला निरोप घेतला. या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात स्वत:च एक स्थान निर्माण केले होते.

प्रसिद्ध मालिकां या प्रसिद्ध मालिकांनी २०१७ मध्ये घेतला निरोप Source : Press

२०१७ मध्ये अनेक प्रसिद्ध मालिकांनी आपल्याला गुड बाय केले. या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात स्वत:च एक स्थान निर्माण केले होते. अशाच टॉप ५ प्रसिद्ध मालिका आपण बघणार आहोत ज्यांनी २०१७ ला निरोप घेतला.

१. पुढचं पाऊल-स्टार प्रवाह
तब्बल सहा वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मराठी मालिका म्हणजे स्टार प्रवाहची पुढचं पाऊल. स्टार प्रवाहवर सर्वाधिक काळ चाललेल्या या मालिकेने सहा वर्षानंतर अखेर १ जुलै २०१७ ला निरोप घेतला. मालिकेतील कल्याणी, अक्कासाहेब या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात आजही घरं करून आहेत. या मालिकेने जुई गडकरीला वेगळी ओळख मिळवून दिली. सासू -सूनेच्या नात्यावर आधारलेल्या या मालिकेत अल्पावधीत प्रेक्षकांना आपलसं करून घेतले होते.

२.काहे दिया परदेस-झी मराठी
मराठमोळी मुलगी गौरी आणि वाराणसीचा मुलगा शिव यांची प्रेमकथा असलेली मालिका काहे दिया परदेस कोणी विसरणं शक्यच नाही. आधी प्रेमकथा आणि नंतर लग्नकथा या मालिकेत दाखवण्यात आली होती. या मालिकेतील गौरी-शिवची जोडी सगळ्यांची लाडकी जोडी होती. या मालिकेने गौरी म्हणजेच सायली संजीव आणि शिव म्हणजेच ऋषी सस्केना यांना ओळख मिळवून दिली. मोहन जोशी, शुभांगी गोखले यासारखे अनेक दिग्गज कलाकारांचा ताफा या मालिकेत होता. २०१६ ला सुरु झालेली ही मालिकेने 23 सप्टेंबर २०१७ ला ४०० भागांनंतर निरोप घेतला. सुरुवातीला हटके प्रेमकथा दाखवणाऱ्या या मालिकेतसुद्धा नंतर सासू-सून मसाला पाहायला मिळाला. शिव-गौरीला जुळी मुलं झालेली दाखवत या मालिकेने गोड शेवट केला.

३. खुलता खळी खुलेना-झी मराठी
प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अशीच एक मालिका म्हणजे 'खुलता कळी खुलेना' ने २०१७ मध्ये निरोप घेतला. या मालिकेत मयुरी देशमुख, अभिज्ञा भावे, ओमप्रकाश शिंदे यांच्या मुख्य भूमिका होत्या. या मालिकेच्या जागी आता 'तुझं माझं ब्रेक अप' मालिका सुरु करण्यात आली. या मालिकेने मयुरी देशमुख, अभिज्ञा भावे, ओमप्रकाश शिंदे यांना ओळख मिळवून दिली.

४. बन मस्का-झी युवा
झी युवा चॅनेलला २०१७मध्येच एक वर्ष पूर्ण झाले. पण या अल्पावधीतच या चॅनेलवरच्या एका मालिकेने प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवलं. बन मस्का ही मालिका अल्पावधीतच तरूणाईच्या पसंतीस उतरली. विषय जास्त न खेचता, कथेची जास्त ओढाताण न करता या मालिकेने योग्य टप्प्यावर निरोप घेतला. बन मस्कामधली सासू-सुनेच्या रटाळ विषयांना टाळत मैत्रेयी आणि सौमित्र यांची हटके लव्हस्टोरी साकारण्यात आली होती. या मालिकेने जूनमध्ये निरोप घेतला.

५. चुकभूल द्यावी घ्यावी-झी मराठी
चुकभूल द्यावी घ्यावी या मालिकेत श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेनंतर दिलीप प्रभावळकर पुन्हा छोट्या पडद्यावर मुख्य भुमिकेत दिसले. चुकभूल द्यावी घ्यावी' या लोकप्रिय नाटकावर आधारित याच नावाची मालिका आधारलेली होती. दिलीप प्रभावळकर यांच्यासह या मालिकेत अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मुख्य भूमिकेत झळकली. नवरा-बायकोमधले वादविवाद- प्रेम एका वेगळ्या अंदाजात यानिमित्ताने पाहायला मिळाले. राजाभाई आणि मालती यांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.

Loading...

You may also like