या कलाकारांची मराठी बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री?

हिंदीप्रमाणे आपल्याला मराठी बिग बॉसमध्येही वाईल्ड कार्ड एन्ट्री पाहायला मिळणार आहे. लवकरच मराठी बिग बॉसच्या घरात चार स्पर्धक येण्याची शक्यता आहे.

मराठी बिग बॉस या कलाकारांची मराठी बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री? Source : Press

हिंदी बिग बॉसप्रमाणे मराठी बिग बॉसच्या घरातसुद्धा सिक्रेट रुम तसेच इतर टास्क पाहायला मिळत आहे. यासोबतच मराठी बिग बॉसमध्येही आपल्याला वाईल्ड कार्ड एन्ट्री पाहायला मिळणार आहे. हो, लवकरच मराठी बिग बॉसच्या घरात चार स्पर्धक येण्याची शक्यता आहे.


देवदत्त नागे: 'जय मल्हार' फेम देवदत्त नागेचे नाव या लिस्टमध्ये सर्वात वर आहे. देवदत्तला शो सुरु होण्याआधी बिग बॉसची ऑफर आली होती. पण बिझी शेड्युलमुळे तो सहभागी होवू शकला नाही. देवदत्तने एका लिडिंग न्यूजपेपरला सांगितले होते की, 'मला बिग बॉस मराठीकडून ऑफर आली होती. पण काही कामांमध्ये व्यग्र असल्याने मी अद्याप होकार दिलेला नाही. पण जर ‘वाईल्ड कार्ड एण्ट्री'साठी विचारण्यात आले तर मी नक्की विचार करेन.' त्यामुळे नागराज बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एण्ट्री घेण्याची चिन्ह दिसतायेत.

शिव ठाकरे: हँडसम हंक शिव ठाकरेला आपण रोडीजच्या याआधीच्या सिझनमध्ये पाहिले आहे. याशिवाय तो एक उत्तम कोरिओग्राफर आणि मॉडेल आहे. त्याची घरातील एन्ट्री जवळजवळ निश्चित मानली जात आहे. शिव सिंगल आहे आणि हँडसमसुद्धा आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात त्याने एन्ट्री घेतली तर कदाचित आपल्याला एक नवीन लव्ह स्टोरीही पाहायला मिळू शकते. 

सायली संजीव: काहे दिया परदेस मालिकेतील गौरी म्हणजेच सायली संजीव या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहचली. सायलीचे बरेच फैन, फॉलोव्हर्स असल्याने तिच्या येण्याने इतर सदस्यांना असुरक्षित वाटू शकते.

प्रथमेश परब: 'टाईमपास' सारख्या सिनेमातून कमी वयात जास्त यश मिळवणारा प्रथमेश परबसुद्धा आपल्याला बिग बॉसमध्ये दिसू शकतो.