बिग बॉसच्या घरात स्मिता गोंदकरचा नवऱ्याबद्दल धक्कादायक खुलासा

अभिनेत्री स्मिता गोंदकरने बिग बॉसच्या घरात आपल्या नवऱ्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

बिग बॉस,स्मिता गोंदकर बिग बॉसच्या घरात स्मिता गोंदकरचा नवऱ्याबद्दल धक्कादायक खुलासा Source : Press

मराठी बिग बॉसच्या घरात कलाकारांच्या आयुष्याची पानं आता उलगडताना दिसत आहेत. 'पप्पी दे पारुला' या गाण्याने लोकप्रिय झालेली अभिनेत्री स्मिता गोंदकरने घरात अनेकदा आपल्या नवऱ्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

स्मिताने जुलै २०११ मध्ये बिझनेसमन आणि पनवेलचा माजी नगरसेवक सिद्धार्थ बाठियासोबत लग्न केले. एक वर्ष आनंदात गेले. पण नंतर स्मिताने सिद्धार्थवर बलात्काराचा आरोप लावला होता. तर दुसरीकडे सिद्धार्थने स्मिता आणि त्याचे लग्नचं न झाल्याचा दावा केला होता. 

नेमकं खरं काय हे जाणून घ्यायची उत्सुकता तिच्या चाहत्यांना होती. तर बिग बॉसच्या घरात स्मितानेच एका टास्कदरम्यान तिला कसे फसवले गेले याचा खुलासा केला.

स्मिताने सांगितले की, 'माझे आयुष्य एकदम मजेत सुरु होते. असे असताना अचानक तो मला भेटला. त्याने मला लग्नाची मागणी घातली. तो माझ्या मागे पडला होता. त्यानंतर मग मलाच वाटलं की, हा आपल्यावर किती प्रेम करतो. हाच आपला आयुष्यभराचा साथीदार असावा. 

लग्नानंतर वर्षभर नीट चाललं होतं. पण नंतर सगळं बिघडत गेलं. तो चुकत गेला आणि मी आपलं हसं होवू नये, कोणी नावं ठेवू नये म्हणून त्याच्या चुकांवर पांघरुन घालत गेले. त्याचा मला प्रचंड त्रास होत होता. वर्षभरानंतर मला कळालं की, त्याचं आधीच एक लग्न झालेलं आहे आणि त्याला दोन मुलंही आहेत.

 एवढंच काय तर त्याने पहिल्या बायकोला अजून घटस्फोटही दिलेला नाही. हे कळाल्यावर मला धक्काच बसला. यातून बाहेर पडण्यासाठी मला बराच वेळ लागला. हे सोपं नव्हतं. तो माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता.'You may also like