नाना पाटेकरांचा 'आपला मानूस' या प्रसिद्ध नाटकाची कॉपी?

नाना पाटेकरांचा 'आपला मानूस' ९ फेब्रुवारीला रिलीज होतो आहे. हा सिनेमा एका नाटकावर आधारित असल्याची चर्चा आहे.

नाना पाटेकर,आपला मानूस नाना पाटेकरांचा 'आपला मानूस' या प्रसिद्ध नाटकाची कॉपी? Source : Press


मराठी सिनेमा 'आपला मानूस' ९ फेब्रुवारीला रिलीज होतो आहे. अजय देवगण निर्मित हा सिनेमा एक मर्डर मिस्ट्रीवर आधारित सस्पेंन्स थ्रिलरपट आहे. पण तुम्हाला ऐकून धक्का बसेल की, हा सिनेमा एका नाटकावर आधारित असल्याची चर्चा सुरु आहे. हो, हा सिनेमा मराठी रंगभूमी गाजवणार नाटक 'काटकोण त्रिकोण' वर आधारित असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. 'आपला मानूस' ची कथा 'काटकोण त्रिकोण' च्या कथेप्रमाणेच फक्त चार माणसांभोवती गुंफलेली दिसून येते आहे. 'काटकोण त्रिकोण' मध्ये मोहन आगाशे यांनी साकारलेली पोलिसाची भूमिका नाना, 'आपला माणूस' मध्ये साकारताना दिसत आहेत. जर 'आपला माणूस' 'काटकोन त्रिकोण' वर आधारित असेल तर मोहन आगाशेंप्रमाणे नानासुद्धा या सिनेमात आबा आणि पोलीस अशा दुहेरी भूमिकेत दिसतील. आता हा सिनेमा 'काटकोन त्रिकोण' वर आधारित आहे की नाही हे तर सिनेमा पाहिल्यावरच कळेल.


नाना पाटेकरां


'आपला मानूस' ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे 'आपला मानूस' ची टक्कर अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन' शी आहे. पण, 'आपला मानूस' हा सस्पेंन्स थ्रीलर सिनेमा आहे. तर 'पॅडमॅन' सामाजिक आशय असलेला सिनेमा आहे. दोन्ही सिनेमांचे विषय वेगळे असल्याने प्रेक्षकवर्ग ही वेगळा आहे. त्यामुळे 'पॅडमॅन'चा 'आपला मानूस' ला फटका बसेल असे वाटत नाही. 'आपला मानूस' हा अजय देवगणचा सिनेमा असून याचे दिग्दर्शन सतीश राजवाडेने केले आहे. नाना या सिनेमात पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहेत. सिनेमाचा ट्रेलर उत्सुकता वाढवणारा आहे. डायलॉग प्रभावी आहेत. नानांसोबतच सुमीत राघवन आणि इरावती हर्षे यांच्या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.