काहे दिया परदेस फेम शुभांगी जोशी यांचं निधन

काहे दिया परदेस या मालिकेतील एक गोड अभिनेत्री म्हणजेच शुभांगी जोशी यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झालं आहे.

शुभांगी जोशी,काहे दिया परदेस काहे दिया परदेस फेम शुभांगी जोशी यांचं निधन Source : Twitter


ज्येष्ठ अभिनेत्री आणि काहे दिया परदेस या मालिकेतून गौरीच्या आजीची भूमिका साकारलेल्या शुभांगी जोशी यांचं आज सकाळी गोरेगाव येथील राहत्या घरी झोपेतच निधन झाले. त्या ७२ वर्षाच्या होत्या.

शुभांगी या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्या सध्या सुरु असलेल्या कुंकू, टिकली आणि टॅटू या मालिकेतून प्रेक्षकांना दिसत होत्या. मात्र त्यांच्या अकाली जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरल्याचं पाहायला मिळत आहे.

काहे दिया परदेस या मालिकेत गौरी ची भूमिका साकारणारी अभिनेत्री सायली संजीव म्हणते "माझे आजी आजोबा मी लहान असतानाच गेले. त्यामुळे त्यांच फार काळ अनुभवता आलं नाही. पण याची सगळी कसर शुभांगी आजीने भरून काढली. माझे खूप लाड तीने केले. माझी पहिली मालिका आणि मला एक छान आजी मिळाली होती. मला केक खूप आवडतो. त्यामुळे ती सकाळी लवकर उठून माझ्यासाठी केक करून आणायची. इतके लाड तीने माझे पुरवले. आता या क्षणी मी तीच्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण डोळ्यासमोर येत आहे."

शुभांगी यांनी आभाळमाया या मालिकेत काम केले असून, नंतर त्या अनेक चित्रपट आणि जाहिरातीं मध्ये दिसल्या.