आणि तिच्या आठवणीने सुबोधला भरून आले

नुकताच सुबोधने एक व्हीडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हीडिओत सुबोध कोणाच्या तरी आठवणीने व्याकुळ झालेला दिसत आहे

सुबोध भावे आणि तिच्या आठवणीने सुबोधला भरून आले Source : Press

अभिनेता सुबोध भावे आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमीच एक्टिव्ह असतो. नुकताच सुबोधने एक व्हीडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हीडिओत सुबोध कोणाच्या तरी आठवणीने व्याकुळ झालेला दिसत आहे. व्हीडिओमध्ये - "हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन, बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन, कावरं बावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही, कोणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही" ही कविता बोलताना भावनिक झालेला सुबोध पाहायला मिळत आहे. कवितेच्या अखेरपर्यंत सुबोधचे डोळे पाणावले होते. कवितेचे बोल तुमच्या मनाला भिडणारे आहेत. त्यातच ही भावनिक कविता सुबोधसारख्या अभिनेत्याच्या तोंडून ऐकताना तुम्हीही आपल्या प्रियजनांसाठी भावनिक व्हाल.

हा व्हीडिओ पाहून तुम्हाला वाटले असेल की, हा सुबोधच्या अपकमिंग फिल्ममधला क्षण असेल. पण तसे नाही. हा क्षण सुबोधच्या रिल लाईफमधला नाही तर रियल लाईफमधला आहे. सुबोध सध्या महिनाभर शुटिंगसाठी बाहेर आहे. यावेळी आपल्या पत्नीची आठवण आल्यानंतर त्याने या कवितेच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. शूटींगदरम्यान हॉटेलरूममधून त्याने हा व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओला सुबोधने - "शुटसाठी महिनाभर बाहेर...त्यात मंजिरीची(बायकोची) आठवण... हे कमी म्हणून वैभव जोशीची कविता...चेहऱ्याला रंग लावता येतोच की आम्हाला" ही कॅप्शन दिली आहे. ही कॅप्शन वाचताना तुम्हालाही नक्कीच भरून येईल.
शूटिंगनिमित्ताने नेहमीच कलाकारांना आपल्या कुटुंबियांपासून लांब राहावे लागते. आपल्या कुटुंबियांना ते वेळ देऊ शकत नाहीत. कलाकारांना अनेकदा कित्येक सण, आयुष्यातील महत्त्वाचे क्षण या सगळ्यांना मुकावं लागतं. अनेक कलाकार तर सेटवरच सण - उत्सव साजरे करतात. कुटुंबियांपासून लांब आपल्या सहकलाकारांसोबत वाढदिवस सेलिब्रेशन करतात. मात्र, आपले कुटुंबिय आपल्या सोबत नसल्याची रुखरुख त्यांना लागलेली असते. अशावेळी सुबोधने कवितेचा आधार घेत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.

You may also like