अभिनेत्री पूजा सावंतचा स्टनिंग लूक व्हायरल

पूजा सावंतच्या सिनेमातल्या या सोज्ज्वळ लूकपेक्षा तिच्या फोटोशूटमधल्या हॉट अँड सेक्सी लूकचीच चर्चा जास्त होते. तिचा एक लूक सध्या व्हायरल झाला आहे.

पूजा सावंत अभिनेत्री पूजा सावंतचा स्टनिंग लूक व्हायरल Source : Press

भेटली तू पुन्हा, दगडी चाळ, पोस्टर बॉईज अशा सिनेमांमधून झळकलेली अभिनेत्री पूजा सावंतचा स्विट अँड सिंपल लूक सगळ्यांच्याच पसंतीस उतरला होता. पण पूजा सावंतच्या सिनेमातल्या या सोज्ज्वळ लूकपेक्षा तिच्या फोटोशूटमधल्या हॉट अँड सेक्सी लूकचीच चर्चा जास्त होते. पूजाचा बॅकलेस साडीमधला बोल्ड लूक तिचे चाहते विसरलेले नाहीत. तिचा हा बोल्ड अवतार सगळ्यांच्याच पसंतीस उतरला होता.

अभिनेत्री पूजा सावंतचा स्टनिंग लूक व्हायरल

सध्याच पूजाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये चाहत्यांना पूजाचा स्टनिंग लूक पाहायला मिळत आहे. पूजाने एनसीपीएच्या नवे वळण या फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली होती. यावेळचा फोटो पूजाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. फोटोमध्ये पूजाने हिरव्या रंगाचा ट्रेडिशनल लाँग स्कट घातलेला दिसत आहे. स्कटवर गोल्डन एमब्रॉयडरी वर्क आहे. स्कटवर पूजाने हिरव्या रंगाचाच ट्रेडिशनल एमब्रॉयडरी वर्क केलेला फ्लरी स्टाईल टॉप घातला आहे. ट्रेडिशनल प्रिटिंगमधल्या या स्कट आणि टॉपमध्ये पूजा स्टनिंग दिसत आहे. पूजाने या लूकसाठी सिंपल हेअरस्टाईल ठेवली होती. पूजाने फक्त केसांची पोनी बांधलेली दिसत आहे. पूजाने कानात लाँग मरुन रंगाचा ट्रेडिशनल स्टाईलमधले इयर रिंग घातले होते. या इयर रिंगमध्ये तिचा लूक अजून खुलून दिसत होता. यासोबत तिने ड्रेसला मॅचिंग असा क्लच आणला होता. हिरव्या रंगाच्या या क्लचवर फुलाचे वर्क केलेले होते.

तिच्या या लूकवर ३५ हजारहून अधिक लाईक्स आणि १६१ कमेंट आल्या आहेत. यावर तिच्या चाहत्यांनी ती खूपच सुंदर आणि स्मार्ट दिसत असल्याची कमेंट केली आहे. तर काहींनी हा रंग तिला होत असल्याची कमेंट दिली आहे. एकदंरीतच हा स्टनिंग लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.


You may also like