अभिनेता रितेश देशमुखची नीरव मोदी प्रकरणावर 'लय भारी' कमेंट

देशात सध्या नीरव मोदी घोटाळ्याची चर्चा होते आहे. या प्रकरणावर अभिनेता रितेश देशमुख एक 'लय भारी' कमेंट केली आहे.

अभिनेता रितेश देशमुख,रितेश देशमुख अभिनेता रितेश देशमुखची नीरव मोदी प्रकरणावर 'लय भारी' कमेंट Source : Press


देशात सध्या नीरव मोदीच्या पीएनबी घोटाळ्याची चर्चा होते आहे. प्रियंका चोप्रा, श्रद्धा कपूर, अनुष्का शर्मासह बॉलिवूड तसेच हॉलीवुड अभिनेत्री नीरव मोदीच्या जाहीरातीत झळकल्या आहेत. देशातील विविध क्षेत्रातील दिग्गज या पीएनबी घोटाळ्यावर आपली प्रतिक्रीया देत आहे. असे असताना सिनेसृष्टीतील कलाकार यामध्ये मागे कसे राहतील? या प्रकरणावर अभिनेते ऋषि कपूर यांनी प्रतिक्रीया दिल्यानंतर आता अभिनेता रितेश देशमुख एक 'लय भारी' कमेंट केली आहे.

रितेशने एक मजेदार ट्विट करत या प्रकरणाची फिरकी घेतली आहे. रितेशने गेल्या वर्षी 'बँकचोर' नावाचा सिनेमा केला होता. बॉक्स ऑफीसवर हा सिनेमा सुपर फ्लॉप ठरला होता. या सिनेमाचे पोस्टर रितेशने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. रितेशने या फोटोला- 'आम्हीच असे बँक चोर आहोत जे अपयशी ठरलो.' अशी हटके कॅप्शन दिली आहे. रितेशच्या या मजेदार ट्विटवर दिवसभरात हजारो कमेंट्स आल्या आहेत. तर अनेकांनी या ट्विटला लाईक केले आहे. सध्या देशात नीरव मोदीच्या पीएनबी घोटाळा प्रकरणावर घमासान सुरु आहे. अशावेळी नेमका हा मुद्दा हेरून रितेशने केलेले हे मजेदार ट्विट सगळ्यांच्या पसंतीला येत आहे.


रितेश देशमुखच्या 'बँकचोर' या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर फक्त आठ कोटींचा गल्ला जमवला होता. या सिनेमात रितेशसोबत विवेक ऑबेराय ही झळकला होता. रितेश नेहमीच सोशल मीडियावर एक्टिव्ह असतो. अनेक सामाजिक विषयांवर तो परखडपणे आपली मत मांडतो. पण अशावेळी नीरव मोदीवर बँकचोर अशी सरळ सरळ टीका न करता मजेदार पद्धतीने केलेली कमेंट चाहत्यांना पसंत आली आहे.

You may also like