Lehren

सोची समझी चाल तो नही

योगगुरु रामदेव बाबा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलीय. बाबा रामदेव यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतलीय.

योगगुरु रामदेव बाबा सोची समझी चाल तो नही Source : Press

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या बेधडक बोलण्यामुळे चर्चेच असतात तर योगगुरु रामदेव बाबा हे योग आणि त्यांच्या पतंजली या प्रोडक्टमुळे चांगलेच चर्चेत असतात. या दोन परस्पर विरोधी व्यक्तीमहत्वांची आज भेट झालीय. भेटीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

योगगुरु रामदेव बाबा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतल्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतलीय. बाबा रामदेव हे सकाळी साडे आठच्या सुमारास राज यांच्या भेटीला पोहचले. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. राजकारण आणि योग या संदर्भात बाबा रामदेव यांनी राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतल्याचे राज यांच्या निकटवर्तियांकडून सागंण्यात येतय.

बाबा रामदेव हे योगाचे आणि आयुर्वेदाचे सर्वात मोठे प्रचारक असून बाबा रामदेव यांना भेटून आनंद झाल्याचे राज यांनी सांगितले आहे. असे असले तरी शिवसेना सद्या राज्यात शेतक-यांच्या मुद्द्यावर भाजपच्या विरोधात उभी ठाकलेली आहे. काही प्रमाणात आघाडीच्या काळात मनसेचा जसा वापर करण्यात आला. तसा वापर भाजपकडून शिवसेनेला रोखण्यासाठी करण्यात येवू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

राज ठाकरे आणि बाबा रामदेव यांच्या अचानक झालेल्या भेटीला चांगलेच महत्व प्राप्त झाले आहे. नक्की सदिच्छा भेट होती ? या मागे कोणते कारण होते. याचीच चर्चा सद्या राजकीय गोटात रंगू लागलीय. वेगवेगळे राजकीय विश्लेषक या भेटीचे नक्की कारण काय आहे. याचा शोध घेत आहेत. त्यामुळे राज आणि बाबा रामदेव यांच्या भेटीच्या निमित्ताने सर्वांना चर्चेसाठी नवीन विषय मिळाला असे म्हणावे लागेल.