हुमा कुरेशीचे अच्छे दिन

रजनीकांत यांच्यासोबत काम करणा-या कलाकारांचे स्टार बदलतात असे बोलले जाते. आता हुमा कुरेशीचे स्टार बदलण्याची वेळ आलीय. हुमा कुरेशी सुपरस्टार रजनीकांतसोबत रोमांस करताना दिसणार आहे.

हुमा कुरेशीचे हुमा कुरेशीचे अच्छे दिन Source : Press

रजनीकांतसोबत काम करण्यासाठी भल्या भल्या बॉलिवुड अभिनेत्री, अभिनेते तरसतात. मात्र या अभिनयाच्या बादशाहसोबत काम करायला मिळणे वाटते तेवढे सोपे नाही. आजपर्यंत बॉलिवुडमधील अनेक अभिनेते, अभिनेत्रींनी प्रयत्न करुनसुध्दा त्यांचे रजनीकांत यांच्यासोबत स्क्रिन शेअर करायचे स्वप्न पूर्ण झाले नाही. रजनीकांत म्हणजे अभिनयातलं चालतं फिरतं विद्यापीठच म्हणावे लागेल. त्यामुळे रजनीकांत यांच्या अभिनयाची जादू सर्वांवरच चालते. अशा या अभिनेत्यासोबत काम करणारांचे स्टार नक्कीच उजळतात यात कोणाचे दुमत नसेल.

आता मात्र बॉलिवुडमध्ये मोजक्या चित्रपटातच काम केलेल्या हुमा कुरेशीला रजनीकांतसोबत रोमांस करायला मिळणार आहे. होय तुम्ही वाचताय ते बरोबरच आहे. हुमा कुरेशी आणि रजनीकांत पा रंजीत यांच्या आगामी तमिल चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. रजनीकांत यांनी स्वता: ही गोष्ट आपल्या चाहत्यांसोबत बोलताना सांगितली आहे. या चित्रपटाचे शुटींग मुंबईमध्ये २८ मे पासून सुरु होणार असून हा चित्रपट प्रेमकथा आणि थरारपट असल्याचे रजनीकांत यांनी सांगितले.

सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत काम करण्यास मिळत असल्याने हुमा कुरेशी चांगलीच खुश आहे. यापूर्वी ऐश्वर्या रॉय, दीपिका पदुकोण, सोनाक्षी सिन्हा आणि राधिका आपटे यांना रजनीकांत यांच्यासोबत स्क्रिन शेअर करायला मिळालीय. आता हुमा कुरेशीला ती संधी मिळालीय. त्यामुळे हुमाचे स्टार तर नक्कीच बदलणार असे म्हणावे लागेल.

या चित्रपटाची निर्मीती रजनीकांत यांच्या मुलीचा पती अभिनेता धनुष करणार आहे. त्यामुळे रजनीकांत यांच्या वयापेक्षा किती तरी कमी वय असलेल्या हुमाची आणि अण्णाची स्क्रिनवरची केमेस्ट्री प्रेक्षकांना पाहायला नक्कीच आवडणार यांत शंका नाही. असे असले तरी हुमाच्या करियरची गाडी रजनीकांत यांच्यामुळे चांगलीच पळू शकते हेसुध्दा तितकेच महत्वाचे म्हणावे लागेल.