Bigg Boss Marathi 2: शेफ पराग कान्हेरेची होणार का पुन्हा एन्ट्री?

बिग बॉसच्या घरातून बाहेर निघालेला शेफ पराग कान्हेरे याला परतण्याची तीव्र इच्छा आहे. जर शिवानी सुर्वे घरात पुन्हा जाऊ शकते तर मी का नाही असा सवाल त्याने केला आहे.

Bigg Boss Marathi 2: शेफ पराग कान्हेरेची होणार का पुन्हा एन्ट्री? Bigg Boss Marathi 2: शेफ पराग कान्हेरेची होणार का पुन्हा एन्ट्री? Source : Press


बिग बॉसच्या सुरवातीच्या दिवसातच अभिनेत्री शिवानी सुर्वे घरातून बाहेर पडली पण लगेच काही दिवसांनी तिने पुन्हा घरात एन्ट्री घेतली. शेफ पराग कान्हेरे सोबत सुद्धा असेच काहीसे झाले. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बिग बॉसने परागला घर सोडण्यास सांगितले.अर्थातच नॉमिनेट न होता घरातून निघालेला पराग याला पुन्हा एन्ट्री मिळेल अशी आशा आहे. एका वृत्तवाहिनीला बोलताना पराग म्हणाला "मला बिग बॉसच्या घरात परत जाण्याविषयी ठाऊक नाही पण शोमध्ये परतण्याची माझी खरंच इच्छा आहे. यासाठी मी गोव्याला गेलो नाही. यासाठी मी माझी कामंसुद्धा पुढे ढकलली आहेत."


तो पुढे म्हणतो कि जर शिवानी सुर्वे या घरात राहू शकते तर मी का नाही. त्या मुलाखतीत त्याने असा खुलासा केला कि शिवानीने शोच्या लोकांना धमकावले आणि असंही म्हणाली कि त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करेल.


पराग हे सुद्धा म्हणाला कि "अभिजीत बिचकुलेंच्या बॅग्स अजूनही घरात आहेत. याचा अर्थ ते अजूनही त्या घराचा हिस्सा आहे. म्हणूनच मला एक चान्स मिळायला हवा."


शिवानी नंतर घरातल्या कारस्थानांना खमंग फोडणी द्यायला पराग परतणार का?


खमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप