Bigg Boss Marathi 2: वीणा आणि हीनामध्ये भाकरीवरून जुंपलं

पोळ्या खाल्ल्या तर माझे पोट भरत नाही आणि मला भाकरीच पाहिजे असं हीना पांचालने सांगितले आणि त्यावर वीणा जगताप सोबत तिचे भांडण झाले.

Bigg Boss Marathi 2: वीणा आणि हीनामध्ये भाकरीवरून जुंपलं Bigg Boss Marathi 2: वीणा आणि हीनामध्ये भाकरीवरून जुंपलं Source : Press


प्रत्येक दिवसागणिक Bigg Boss Marathi 2 एका रंगतदार वळणावर जात आहे. मग ते घरातल्या सदस्यांची भांडणे असो नाहीतर टास्क असो. असाच एक भांडण कालच्या भागात पाहायला मिळालं वीणा जगताप आणि हीना पांचालमध्ये.वीणा आणि हीनामध्ये एका भाकरीवरून जुंपलं. घरात जे आणि जितकं सामान आहे त्यातच त्यांना सगळ्यांसाठी जेवण बनवायचं होतं जोपर्यंत बिग बॉस त्यांना त्यांचं सामान परत देत नाहीत. सर्वानुमते पोळ्या करण्याचं ठरलं तितक्यात हीना येऊन म्हणाली की पोळ्यांमध्ये तिचं पोट भरत नाही आणि तिला भाकरीच खायची आहे. वीणाच्या आईचा वाढदिवस असल्याने तिला तिच्या आईसाठी प्रसाद बनवायचा होता पण तेल कमी असल्याने तिने तो बनवण्यास नकार दिला आणि असंही सांगितलं की घरात जे बनेल ते सगळ्यांना खावंच लागेल कोणासाठी बनणार नाही. तिने हेही सांगितलं की काल शिवला भूक लागली तेव्हा कोणी आम्हाला सेपरेट बनवून दिलं नाही.थोड्या वादावादीनंतर हीनाने होकार देत आपला मुद्दा पटवून दिला. २ दिवसाआधी बिग बॉसने घरातलं सर्व अन्न जप्त केलं होतं कारण घरातले सदस्य वारंवार झोपत होते. किशोरी शहाणे, शिव ठाकरे यांना बझ्झर वाजवून उठवायला लागले इतके गाढ ते झोपले होते.शनिवारी या मुद्द्यांवर महेश मांजरेकर चर्चा करणार का हे पाहणे औत्सुक्याचं ठरेल.खमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप