#10YearChallenge: पहा कसे दिसतात तुमचे आवडते कलाकार १० वर्षांपूर्वी

काही मराठी कल्ला-कारांनी #10yearchallenge स्वीकारला आहे! पहा कसे दिसतात तुमचे आवडते कलाकार १० वर्षांपूर्वी.

#10YearChallenge: पहा कसे दिसतात तुमचे आवडते कलाकार १० वर्षांपूर्वी #10YearChallenge: पहा कसे दिसतात तुमचे आवडते कलाकार १० वर्षांपूर्वी Source : Instagram


आजकालच्या टेक्नो सॅव्ही युगात जर आपल्याला प्रसिद्ध व्हायचं असेल तर सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. मग ते फेसबुक वरचे लाईव्ह असो, इंस्टाग्राम वरचे फोटोस असो किव्हा ट्विटर वरची टिव टिव असो, इथे सारं काही वायरल होतं.

असाच एक चॅलेंज सध्या खूप वायरल होतेय. #10YearChallenge. या चॅलेंन्जने अगदी बॉलीवूड आणि हॉलिवूड कलाकारांनाही भुरळ घातली आहे, मग अशात आपले मराठी कलाकार कसे मागे राहतील.

काही मराठी कल्ला-कारांनी हा चॅलेंज स्वीकारला आहे आणि आपण १० वर्षांपूर्वी कसे दिसत होतो हे फोटोसद्वारे दाखवले आहे. पहा १० वर्षांपूर्वी कसे दिसत होते तुमचे आवडते कलाकार.

१. अक्षया देवधर: सर्वांची लाडकी अंजलीबाई म्हणजेच अक्षया देवधर ने आपला १० वर्ष जुना फोटो इंस्टाग्राम वर शेअर केला. विशेष म्हणजे अक्षया मध्ये या १० वर्षात फारसा काही बदल झालेला दिसत नाही. 

Akshaya Deodhar

२. अमेय वाघ: अभिनयातील वाघ अशी ओळख असलेल्या अमेय वाघने आपल्या फोटोला एक भन्नाट कॅप्शन दिलाय. तो लिहितो "आता आयुष्यातले challenges काय कमी होते !!! त्यात हा 10 year challenge आलाय! चल... घेतला !"

Amey Wagh

३. सिद्धार्थ चांदेकर: चॉकलेट बॉय सिद्धार्थ १० वर्षांपूर्वीही तसाच होता. अगदी गोड, सालस आणि गोंडस. सिद्धार्थ मध्ये बराच फरक झालेला दिसतोय. म्हणजे तो हॅंडसम दिसतोय असा म्हणायला  हरकत नाही. 

Siddharth Chandekar

४. सुयश टिळक: रंगमंच, मालिका आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाची छाप पाडणारा पारंगत अभिनेता म्हणजे सुयश टिळक. या फोटोमध्ये सुयशचे २ नवीन लूक्स पाहायला मिळतात. १० वर्षांपूर्वी गोड दिसणारा सुयश, बापमाणूसमध्ये एका रांगड्या अवतारात सगळ्यांना दिसला आणि भावलासुद्धा. 

Suyash Tilak

५. मयुरी वाघ: आपली लाडकी अस्मिता म्हणजेच मयुरी वाघने तिची पहिली मालिका वचन दिले तू मला आणि आताचा असे २ फोटो शेअर केले. मयूरीमध्येहि फारसा बदल झालेला दिसत नाही. 

Mayurri Wagh

६. तेजश्री प्रधान: मुळात ग्लॅमरस असणारी तेजश्री या जुन्या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसतेय. जान्हवी ची भूमिका घराघरात पोहोचवणारी तेजश्री पुन्हा मालिकांमध्ये कधी दिसणार याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली आहे.

Tejashri Pradhan

७. गौरी नलावडे: "2008 to 2018 , 2029 साठी आत्ताच १ फोटो shortlist करून ठेवायला हवा !! बघा मोजून ठेवा किती वय होणार" असं गौरी म्हणते. 

Gauri Nalawade

८. संग्राम समेळ: बापमाणूस मधून आणखी एक अभिनेता झळकला तो म्हणजे संग्राम समेळ. मुळातच रांगडा आणि डॅशिंग असलेला संग्राम या फोटोमध्ये खूपच वेगळा दिसतोय. 

Sangram Samel

९. हर्षद अतकरी: अंजली या मालिकेतील डॉक्टर यश सगळ्यांनाच ठाऊक असेल. पहा हर्षद चा हा जुना फोटो आणि तुम्ही त्याचे फॅन व्हाल. 

Harshad Atkari

१०. ऋषी सक्सेना: काहे दिया परदेस मधील ऋषी एका मालिकेतून कमालीचा लोकप्रिय झाला. १० वर्षांपूर्वीचा हा ऋषी आणि आताचा ऋषी किती वेगळा दिसतो नई.

Rishi Saxena


Download The Lehren App For Latest & More News, Gossips And Videos.