'बिग बॉस' मराठी २: पहा कोणते कलाकार होणार घरात कैद

वादग्रस्त पण तेवढाच लोकप्रिय अश्या या शोचा फॉरमॅट असला तरीही प्रेक्षकांमध्ये याची उत्सुकता गेली २ वर्ष पाहायला मिळतेय. तर यंदा कोणकोणते स्पर्धक या वादग्रस्त घरात प्रवेश करणार पाहूया.

'बिग बॉस' मराठी २: पहा कोणते कलाकार होणार घरात कैद 'बिग बॉस' मराठी २: पहा कोणते कलाकार होणार घरात कैद Source : Press


'बिग बॉस' मराठीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली असून काल बिग बॉसच्या घरात प्रवेश करणाऱ्या कलाकारांची नावे जाहीर करण्यात आली. अनेक दिवसांची उत्सुकता संपवत सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांना घरात जाण्याआधी शुभेच्छा दिल्या आणि सोबत काही टिप्ससुद्धा.वादग्रस्त पण तेवढाच लोकप्रिय अश्या या शोचा फॉरमॅट असला तरीही प्रेक्षकांमध्ये याची उत्सुकता गेली २ वर्ष पाहायला मिळतेय. तर यंदा कोणकोणते स्पर्धक या वादग्रस्त घरात प्रवेश करणार पाहूया.१. किशोरी शहाणे विज


२. दिगंबर नाईक


३. नेहा शितोळे


४. अभिजीत बिचुकले


५. वैशाली माडे


६. वीणा जगताप


७. शिवानी सुर्वे


८. सुरेखा पुणेकर


९. विद्याधर उर्फ बाप्पा जोशी


१०. शेफ पराग कान्हेरे


११. मैथिली जावकर


१२. माधव देवचक्के


१३. रुपाली भोसले


१४. अभिजित केळकर


१५. शिव ठाकरेकिशोरी आणि इतर कलाकारांनी सादर केलेले नृत्याविष्कार असो किंवा दिगंबरने घातलेले गाऱ्हाणे असो, नाहीतर कविता असो, बिग बॉसचा हा ग्रँड प्रेमीयेर अधिकच ग्रँड होता.मोठं घर, मुलींच्या खोलीत भिंतीवर नथ आणि घुंगरू, मुलांच्या खोलीत छतावर घंट्या, कन्फेशन रूमच्या भिंतीवर असंख्य डोळे असा काहीसा भव्यदिव्य बिग बॉसचा सेट गोरेगावच्या फिल्म सिटीमध्ये उभारण्यात आला आहे.खमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप