२०१९ मधील ६ मराठी चित्रपट जे मारणार बॉक्स ऑफिस वर बाजी

दिग्गज मराठी कलाकार आणि अप्रतिम कथानक याचा सुरेल संगम असणारे हे चित्रपट प्रेक्षकांच्या कितपत पसंतीस उतरतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. पाहूया कोणते ६ मराठी चित्रपट २०१९ मध्ये लावणार बॉक्स ऑफिस वर बाजी!

२०१९ मधील ६ मराठी चित्रपट जे मारणार बॉक्स ऑफिस वर बाजी २०१९ मधील ६ मराठी चित्रपट जे मारणार बॉक्स ऑफिस वर बाजी Source : Press


२०१८ साल चित्रपटप्रेमींसाठी पर्वणीचा काळ ठरला. नाळ, मुंबई पुणे मुंबई ३, बकेट लिस्ट, बॉईज २, बबन, सविता दामोदर परांजपे, रणांगण, वाघेऱ्या, गुलाबजाम असे एक ना अनेक चित्रपट प्रदर्शित झाले.

बॉक्स-ऑफिस गाजवणारे हे चित्रपट प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरले. सरत्या वर्षाला मागे सारून, २०१९ हे साल सुद्धा प्रेक्षकांसाठी अनेक चित्रपट घेऊन येत आहे. दिग्गज मराठी कलाकार आणि अप्रतिम कथानक याचा सुरेल संगम असणारे हे चित्रपट प्रेक्षकांच्या कितपत पसंतीस उतरतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

पाहूया कोणते ६ मराठी चित्रपट २०१९ मध्ये लावणार बॉक्स ऑफिस वर बाजी!

१. सोहळा: दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचा आगामी चित्रपट सोहळा जानेवारी ४ ला प्रदर्शित होत असून त्यात सचिन पिळगावकर, शिल्पा तुळसकर, विक्रम गोखले आणि लोकेश गुप्ते हे मुख्य कलाकार असतील. कुटुंब, नातेसंबंध, आणि नात्यांमध्ये आज आलेला दुरावा या गोष्टींवर चित्रपट भाष्य करेल.

२. ये रे ये रे पैसा २: २०१८ साली संजय जाधव दिग्दर्शित चित्रपट ये रे ये रे पैसा चांगलाच गाजला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर कमाई करत प्रेक्षकांचीही मने जिंकली. तेजस्विनी पंडित, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, आणि संजय नार्वेकर असे तगडे कलाकार या चित्रपटात एकत्र पाहायला मिळाले. ये रे ये रे पैसा २ आता येऊन ठेपणार आहे पण यातील कलाकारांची नावे अजून गुप्तच ठेवण्यात आली आहेत.

३. भाई- व्यक्ती आणि वल्ली: पु.लं देशपांडे यांची जीवनपट उलगडणारा सिनेमा म्हणजेच भाई- व्यक्ती आणि वल्ली. अभिनेता सागर देशमुखच पु.लं साकारत नाही तर अभिनेता सक्षम कुलकर्णीने शालेय जीवनातील पु.लं साकारले आहेत. महेश वामन मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून सागर देशमुख सोबत इरावती हर्षे, मृण्मयी देशपांडे आणि सचिन खेडेकर यांच्या मुख्य भूमिका असतील. हा चित्रपट ४ जानेवारीला प्रदर्शित होईल.

४. मी पण सचिन: सचिन तेंडुलकर हे नाव काही विसरण्यासारखं नाही. जगात एखादाच कोणीतरी वल्ली असेल ज्याला क्रिकेट चा हा देव ठाऊक नसेल. मुंबई पुणे मुंबई ३ मधून आपल्या भेटीला आलेला गौतम म्हणजेच स्वप्नील जोशी यात प्रमुख भूमिकेत असून हि एका ध्येयवेड्या माणसाची गोष्ट आहे. 'मी पण सचिन' चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

५. सर्व लाईन व्यस्त आहेत: कलाकारांचा फौजफाटा असलेला हा चित्रपट विनोदाची एक हलकी फुलकी लहर घेऊन येईल. सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, हेमांगी कवी, संस्कृती बालगुडे, नीथा शेट्टी, कमालकर सातपुते आणि बरेच विनोदवीर या चित्रपटात पाहायला मिळतील. ११ जानेवारी ला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

६. कागर: सैराट च्या अभूतपूर्व यशानंतर आपल्या सगळ्यांची आवडती आरची म्हणजेच रिंकू राजगुरू कागर या चित्रपटातून आपल्या भेटीस येत आहे. १४ फेब्रुवारी या प्रेमदिनी हा चित्रपट प्रदर्शित होत असून रिंकूला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर बघण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे.