होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करत मधुरा वेलणकरने पूर्ण केला प्रयोग

'गुमनाम है कोई' या नाटकाच्या प्रयोगाच्यावेळी अचानक मधुराचा पाय लचकला. पण तरीही होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करत तिने प्रयोग पूर्ण केला.

होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करत मधुरा वेलणकरने पूर्ण केला प्रयोग होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करत मधुरा वेलणकरने पूर्ण केला प्रयोग Source : Press


सिनेमा आणि मालिकांमध्ये ऍक्शन आणि कटची समीकरणे चालतात. एखाद्या नटाने किंवा नटीने जर काही चूक केली तर ती सुधारायला अनेक संधी मिळतात. पण रंगभूमीचे तसे नसते. रंगभूमी हे सर्वात अवघड माध्यम आहे असं म्हणायला हरकत नाही.


लागोपाठ ३ ते ४ तास प्रयोग करणे आणि त्यात एकही चूक न होऊन देणे यावरच अभिनेत्याचे कसब कळते. असंच काहीसं झालं अभिनेत्री मधुरा वेलणकरसोबत. 'गुमनाम है कोई' या नाटकाच्या प्रयोगाच्यावेळी अचानक मधुराचा पाय लचकला. पण तरीही होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करत तिने प्रयोग पूर्ण केला.


"पुढे चाळीस मिनिटं रंगमंचावर वावरत तिनं प्रयोग पूर्ण केला. या प्रयोगाला तिला दुखापत झाली. आणि त्या अगोदरच्या दोन प्रयोगांच्या वेळीही तिची तब्येत ठीक नव्हती. तिच्या अंगात ताप होता. पण, तापानं फणफणलेली असतानाही तिनं प्रयोग रद्द केले नाहीत" असं एका वाहिनीने नमूद केले.


काहीही झालं तरी द शो मस्ट गो ऑन हे वाक्य मधुराने खरं करून दाखवलं. आता डॉक्टरांनी मधुराला विश्रांती घ्यायला सांगितली आहे. लवकरच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे 99 व्या नाट्य संमेलन दादासाहेब धनवटे नगर विद्यालयाच्या मैदानावर 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2019 या कालावधीत संपन्न होणार आहे. मधुराला या संमेलनाला जाण्यापूर्वी थोडी विश्रांती मिळेल.


Download The Lehren App For Latest & More News, Gossips And Videos.