स्वप्नील जोशी जिवलगा मालिकेतून करणार टीव्हीवर कमबॅक!

आपल्या सर्वांचा लाडका स्वप्नील जोशी पुन्हा एकदा टीव्हीवर परतणार आहे. जिवलगा ह्या आगामी मालिकेतून स्वप्नील, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर आणि मधुरा देशपांडे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

स्वप्नील जोशी जिवलगा मालिकेतून करणार टीव्हीवर कमबॅक! स्वप्नील जोशी जिवलगा मालिकेतून करणार टीव्हीवर कमबॅक! Source : Press


एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेनंतर अभिनेता स्वप्नील जोशी पुन्हा एकदा टेलिव्हिजन वर परतणार आहे. गेले अनेक दिवस मोगरा फुललाच्या प्रोमोशन सोबतच स्वप्नीलने सांगितले कि तो अजून काहीतरी नवीन करणार आहे. प्रेक्षकांची उत्सुकता अधिक न ताणता स्वप्नीलने जिवलगा ह्या आगामी मालिकेतून आपण परत टीव्हीवर येणार असे जाहीर केले.इतकेच नव्हे तर अग्निहोत्र या मालिकेत दिसलेला अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसुद्धा या मालिकेत झळकणार आहे. शिवाय अप्सरा अमृता खानविलकर टीव्हीवर डेब्यू करत आपले नशीब अजमावणार आहे. या पूर्वी अमृता काही रिऍलिटी शोची जज म्हणून दिसली होती. तसेच कन्यादान या मालिकेची अभिनेत्री मधुरा देशपांडे जिवलगा मध्ये महत्वाचे पात्र निभावणार आहे.स्वप्नीलने जेव्हा मालिकेचे प्रोमोशन करायला सुरुवात केली तेव्हा सगळ्यांना वाटले की हा त्यांचा आगामी चित्रपट आहे. या चौघांच्या सोशल मिडियावरून त्यांची मालिकेतली नावे समोर आली आहेत. स्वप्नील जोशी विश्वास ही भूमिका साकारत आहे तर अमृताच्या भूमिकेचे नाव काव्या आहे. सिद्धार्थ निखिल ही भूमिका साकारत असून मधुरा विधी हे पात्र साकारत आहे.काय आहे ही मालिका? याचं कथानक कसं असेल? नेहमीच्या मालिकांपेक्षा जिवलगा वेगळी ठरेल का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मालिका पाहिल्यावर मिळतीलच. ८ एप्रिल, २०१९ पासून हि मालिका सोमवार ते शनिवार स्टार प्रवाहवर दिसेल.खमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप