स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकरने स्वीकारले #BottleCapChallenge

स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकरने #BottleCapChallenge स्वीकारले आहे. पहा त्याचे गमतीशीर व्हिडिओ.

स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकरने स्वीकारले #BottleCapChallenge स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकरने स्वीकारले #BottleCapChallenge Source : Press


Dele Challenge नंतर आता Bottle Cap Challenge खूपच गाजत आहे. जेसन स्टेथॅम यांनी सर्वात पहिला हा चॅलेंज स्वीकारला आणि पुढे काही लोकांना हा चॅलेंज करण्यासाठी नॉमिनेट केले.हळू हळू हिंदी चित्रपटश्रुष्टीतले कलाकार ते चॅलेंज करू लागलेत. अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, सिद्धार्थ मल्होत्रा नंतर आता मराठीतल्या कलाकारांना त्याची गोडी लागली आहे.जिवलगा मालिकेत सध्या झळकणारा चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी आणि त्याची सहकलाकार अमृता खानविलकर ह्यांनी हे चॅलेंज दाखवले आहे. पहा स्वप्नीलचा हा व्हिडिओ.
स्वप्नीलचा प्रयोग जरी फसला असला तरी अमृताने मात्र एका हटके अंदाजात हे चॅलेंज करून दाखवले आहे. "Why Should Boys Have All The Fun" असं हटके कॅप्शन देत तिने तिच्या साडीच्या पल्लूने बाटलीचे झाकण उघडून दाखवले आहे.पहा हा व्हिडिओ.
काही महिन्यांपूर्वी स्वप्नीलने मोगरा फुलला सोबतच आपण अजून काहीतरी नवीन करणार असे सांगितले होते. प्रेक्षकांची उत्सुकता अधिक न ताणता स्वप्नीलने जिवलगा ह्या आगामी मालिकेतून आपण परत टीव्हीवर येणार असे जाहीर केले.जिवलगा या मालिकेत सिद्धार्थ चांदेकर आणि मधुरा देशपांडे सोबतच सीमा देशमुख, सीमा चांदेकर, राजन भिसे असे तगडे कलाकार आहेत.स्वप्नील आणि अमृतानंतर आता हे चॅलेंज आणखी कोणते मराठी कलाकार स्वीकारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.खमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप