सूर सपाटामध्ये प्रवीण तरडे दिसणार एका वेगळ्या भूमिकेत

प्रवीण तरडे आता एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वाचा कशी असेल त्याची नवी भूमिका

सूर सपाटामध्ये प्रवीण तरडे दिसणार एका वेगळ्या भूमिकेत सूर सपाटामध्ये प्रवीण तरडे दिसणार एका वेगळ्या भूमिकेत Source : Press


प्रवीण तरडे हे नाव मराठी सिने-रसिकांसाठी काही नवीन नाही. एक उत्तम लेखक, अभिनेता आणि तितकाच हरहुन्नरी निर्माता-दिग्दर्शक अशी जरी त्यांची ओळख असली तरी प्रवीण अजून एका विभागात 'प्रवीण' आहेत. ते म्हणजे प्रवीण एकेकाळी कबड्डी व सॉफ्टबॉलचे राष्ट्रीय खेळाडू होते.


हि गोष्ट जरी आपल्याला माहित नसली तरी त्याची झलक आता आपल्यायाला सूर सपाटा या त्यांच्या आगामी चित्रपटात पाहता येणार आहे. 'सूर सपाटा' मध्ये कबड्डी सामन्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या 'पंच'ची भूमिका प्रवीण तरडे निभावताना दिसणारेत.


सूर सपाटा ही कब्बडी वेड्या मुलांची गोष्ट असून, त्याच्या ट्रेलरने मराठी रसिकांना वेड लावले होते. सिनेमातले एक गाणे 'कर कहर' हि रिलिज करण्यात आले आहे. कर कहर हे गाणं अभिनय जगताप आणि जसराज जोशी यांनी गायले असून, मंगेश कांगणे यांनी ते शब्दबद्ध केले आहे.


हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय पटवर्धन, रुपेश बाणे, जीवन कराळकर, सुयश शिर्के, शरयू सोनावणे, आणि निनाद तांबाडे यांच्यावर चित्रित झालेले हे गाणं प्रेक्षकांना चांगलंच भावलं आहे.


सूर सपाटा हा चित्रपट लाडे ब्रोज फिल्म्स प्रा. ली. प्रस्तुत जयंत लाडे निर्मित आणि मंगेश कंठाळे दिग्दर्शित होलिकोत्सवाचे औचित्य साधत २१ मार्चला रसिक-प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.


खमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप