सुयश टिळक आणि सुरुची आडारकर या मालिकेमध्ये पुन्हा एकत्र दिसणार

आपल्या सर्वांचे लाडके जय आणि अदिती म्हणजेच सुयश टिळक आणि सुरुची आडारकर पुन्हा एकदा एकत्र एका मालिकायेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

सुयश टिळक आणि सुरुची आडारकर या मालिकेमध्ये पुन्हा एकत्र दिसणार सुयश टिळक आणि सुरुची आडारकर या मालिकेमध्ये पुन्हा एकत्र दिसणार Source : Press


'का रे दुरावा' मधले जय आणि अदिती सगळ्यांनाच ठाऊक असतील. इतकी गोड जोडी कोण विसरेल म्हणा! सुयश टिळक आणि सुरुची आडारकर 'का रे दुरावा' नंतर बापमाणूस आणि अंजली मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले.


पण ही जोडी पुन्हा एकत्र कधी येणार याची उत्सुकता लोकांना लागून राहिली होती. तर अश्या प्रेक्षकांसाठी एक गोड बातमी आहे. सुयश आणि सुरुची पुन्हा एकत्र येणार आहेत ते हि एक नवी कोरी मालिका घेऊन.


झी युवा वरच्या एक घर मंतरलेलं या मालिकेचे प्रोमो तुम्ही पहिले असतील तर त्यात तुम्हाला सुरुची दिसते पण सुयशही त्या मालिकेत झळकणार आहे . याची माहिती खुद्द सुयशने आपल्या इंस्टाग्राम वर दिली.


"तुम्ही सगळ्यांनी "का रे दुरावा" पासून खूप प्रेम दिलं आहे आम्हाला. त्या नंतर "स्ट्रॉबेरी"नाटकात आम्ही एक वेगळा प्रयत्न केला होता तो ही तुम्ही पसंत केलात. आता iris productions सोबत आणि पुन्हा एकदा झी युवा वाहिनी सोबत @zeeyuva आम्ही ही नवीन मालिका घेऊन येतोय. "एक घर मंतरलेलं" ही मालिका ४ मार्च पासून येतीये. रोज रात्री ९:३० वाजता झी युवा वर. जरा वेगळा विषय आहे. अनेक रहस्य आहेत. अश्या आमच्या रहस्यमयी प्रवासात सामील व्हा!!! नेहमी प्रमाणे तुमच्या सगळ्यांच्याच आशीर्वादाची व भरपूर प्रेमाची गरज आहे. झीयुवा वाहिनी तुमच्या टेलिव्हिजन पॅकेज मध्ये आहे ह्याची खात्री करून घ्या व नक्की बघा" असं सुयश लिहितो.


काय मग, उत्सुक आहेत ना सुयश आणि सुरुचीला एकत्र पाहायला?


खमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप.