सखी गोखले आणि सुव्रत जोशी अडकले लग्नाच्या बेडीत

सगळ्या अफवांना खरे ठरवत सखी गोखले आणि सुव्रत जोशी अखेर लग्नबंधनात अडकले आहेत.

सखी गोखले आणि सुव्रत जोशी अडकले लग्नाच्या बेडीत सखी गोखले आणि सुव्रत जोशी अडकले लग्नाच्या बेडीत Source : Press


काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सखी गोखले आणि सुव्रत जोशी हे लवकरच लग्न करणार आहेत अश्या चर्चांना उधाण आले होते. त्यासाठी सखीने शेअर केलेला एक फोटो कारणीभूत ठरला होता. पण आता या सगळ्या अफवांना खरे ठरवत सखी आणि सुव्रत अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. सखीची मेहंदी सेरेमनी बुधवारी पार पडली व त्यानंतर एक जंगी सेलिब्रेशन सुद्धा झाले. यावेळी डान्स करतानाचा त्या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


सखी आणि सुव्रतच्या लग्नाला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. अमेय वाघ, पर्ण पेठे, पूजा ठोंबरे, निपुण धर्माधिकारी, सुनील बर्वे, सुमीत राघवन, चिन्मयी असे एक ना अनेक कलाकार नवविवाहितांना आशीर्वाद देण्यासाठी हजर होते. अगदी थाटामाटात आणि साग्रसंगीत असा हा विवाह सोहळा पार पडला.


पर्णने शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीमुळे हे गुपित सगळ्यांना कळले. पर्णने जेव्हा त्यांचा गाडीमधला फोटो शेअर केला तेव्हा वर पक्ष असे लिहिले आणि लगेचच सुव्रतचा एक फोटो शेअर केला. तेव्हा सखी आणि सुव्रतचे लग्न आहे हे त्यांच्या चाहत्यांना समजले. सखी आणि सुव्रत हे दोघे मात्र अजूनही काही बोललेले नाहीत.


हिरव्या रंगाच्या साडीत सखी अधिकच खुलून दिसत होती आणि सुव्रतही तिला चांगलाच कॉम्प्लिमेंट करत होता.


सुरुवातीपासूनच त्यांनी आपली रेलशनशिप गुपित ठेवली आहे. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे त्यांची ओळख झाली आणि तीच ओळख नंतर मैत्री आणि मग त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटला जर तुम्ही भेट दिलीत तर तुम्हाला त्यांचे अनेक एकत्र फोटोस पाहायला मिळतील.


सखी आणि सुव्रत, तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा.


खमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप