लग्न सराई! हे ४ प्रसिद्ध मराठी कलाकार अडकले लग्नाच्या बेडीत

अलीकडेच अनेक लग्नसोहळे पार पडले. पहा हे ४ मराठी कलाकार आणि त्यांच्या लग्नाचे फोटोस.

लग्न सराई! हे ४ प्रसिद्ध मराठी कलाकार अडकले लग्नाच्या बेडीत लग्न सराई! हे ४ प्रसिद्ध मराठी कलाकार अडकले लग्नाच्या बेडीत Source : Press


हल्ली सगळीकडेच लग्नाचा मौसम सुरु झाला आहे. तुळशीची लग्न उरकल्यावर लोकांना उत्सुकता असते ती आपल्या लग्नाची. अलीकडेच अनेक लग्नसोहळे पार पडले. रणवीर सिंग- दीपिका पादुकोन, प्रियांका चोप्रा- निक जोनस सोबतच अनेक मराठी कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले.


पहा हे ४ मराठी कलाकार आणि त्यांच्या लग्नाचे फोटोस.


1. नेहा गद्रे: मन उधाण वाऱ्याचे आणि अजूनही चांदरात आहे फेम नेहा गद्रे हिने नुकतेच ईशान बापट याच्यासोबत लग्न केले. ईशान क्राइमस्टॉपर्स क्वीनलँड येथे कार्यरत असून १० जुलै २०१८ रोजी नेहा व त्याने साखरपुडा केला होता. पण याची खबर कोणालाच लागून दिली नव्हती. साखरपुडा जरी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत झाला असला तरी लग्न मात्र थाटामाटात झाले.

Neha Gadre


2. स्मिता तांबे : आपल्या सर्वांची लाडकी स्मिता तांबेने विरेंद्र द्विवेदीसोबत लगीनगाठ बांधली. महाराष्ट्रीयन आणि उत्तर भारतीय अशा दोन्ही पारंपरिक पद्धतीने लग्न पार पडलं आहे. लग्नाला दोघांच्या कुटुंबातील मोजक्या लोकांना आमंत्रण देण्यात आलं होते. स्मिताची अगदी जवळची मैत्रीण रेशमी टिपणीस हिने स्मिताच्या लग्नाचे फोटो शेअर केले.

Smita Tambe


3. श्रेयस जाधव : मराठीतील एकमेव रॅपर आणि किंग जे. डी हा किताब मिळवलेला श्रेयस जाधव यानेसुद्धा लग्न केले. भाग्यश्री सोमवंशी असे त्याच्या बायकोचे नाव असून मुंबईत श्रेयस आणि भाग्यश्रीचा दिमाखदार विवाहसोहळा पार पडला.

Shreyas


4. सुरभी हांडे : जय मल्हार मधील म्हाळसा म्हणजेच सुरभी हांडेने दुर्गेश कुलकर्णी सोबत नुकताच विवाह केला. सुरभी आणि दुर्गेश मधील गोड केमिस्ट्री तिने शेअर केलेल्या फोटोसमधून दिसून येते. सुरभी आणि दुर्गेश यांचा साखरपुडा ऑगस्ट मध्ये पार पडला होता.

Surbhi Hande


खमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप

You may also like