रिंकू राजगुरुने शेअर केला तिचा डाएट प्लॅन

रिंकू राजगुरूच्या या नव्या लूकचे रहस्य काय? रिंकूने स्वतः याचा खुलासा केला आहे.

रिंकू राजगुरुने शेअर केला तिचा डाएट प्लॅन रिंकू राजगुरुने शेअर केला तिचा डाएट प्लॅन Source : Inhouse


अभिनेत्री रिंकू राजगुरू जिने नागराज मंजुळे यांच्या सैराट या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला सध्या एका नव्या सिनेमाच्या तयारीत गुंतली आहे. सैराट नंतर रिंकूचा कागर हा सिनेमा प्रदर्शित झाला ज्यात तिचा नवा लुक सगळ्यांना मिळाला. कागर चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी तिचा एक डान्स व्हिडिओ आला त्यात ती प्रचंड वेगळ्या अवतारात दिसली.काहीशी जाड असलेली आर्ची या व्हिडिओमध्ये बारीक झालेली दिसली. तिच्या या नव्या लूकचे रहस्य काय? रिंकूने स्वतः याचा खुलासा केला आहे. एका नामांकित वृत्तवाहिनीशी बोलताना रिंकू म्हणाली "सैराट संपल्यानंतर माझ्या लक्षात आले की, माझे वजन चांगलेच वाढले आहे. मी खूपच जाडी दिसत असल्याचे मला जाणवत होते. वजन वाढणे तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच चांगले नसते. त्यामुळे वजन कमी करण्याचे मी ठरवले. त्यावेळी मी दहावीची परीक्षा देत होते. मी वजन कमी करण्यासाठी सकाळी चार वाजता उठून चालायला जायचे. तसेच थोडा बहुत व्यायाम करायचे. मी डाएट देखील खूप चांगल्या प्रकारे केले. मी केवळ सलाडच खात असे. खरे तर मला गोड पदार्थ खूप आवडतात. पण मी पूर्णपणे गोड सोडले होते. एवढेच नव्हे तर माझ्या घरात गोड बनवले जात असेल तर मी तिकडे फिरकायची पण नाही. तसेच माझ्यासमोर कोणी गोड खात असेल तर मी तिथून लगेचच उठून जायचे. हे सगळे करून मी दोन महिन्यात १० ते १२ किलो वजन कमी केले. या सगळ्याचा मला खूप फायदा झाला. मी वजन कमी करण्यासाठी कोणत्याही ट्रेनरची मदत घेतली नाही. माझी आई माझी ट्रेनर आणि डायटिशियन होती."


कागर नंतर रिंकू मेकअप या नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासाठी तिला शुभेछा.


खमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप