रणवीर सिंगच्या ८३ मधले महत्वाचे दोन मराठी शिलेदार

रणवीर सिंगच्या ८३ या चित्रपटात २ मराठी कलाकारांची वर्णी लागली असून आदिनाथ कोठारे आणि चिराग पाटील हे महत्वाची पात्र साकारताना दिसणार आहेत

रणवीर सिंगच्या ८३ मधले महत्वाचे दोन मराठी शिलेदार रणवीर सिंगच्या ८३ मधले महत्वाचे दोन मराठी शिलेदार Source : Press


क्रिकेटचा बादशाह कपिल देव यांनी १९८३ मध्ये इतिहास घडवला. भारताने वेस्ट इंडिजच्या संघाला लोळवत वर्ल्ड कप जिंकला आणि ते सारे क्षण प्रत्येक भारतीयाच्या मनात अजूनही टवटवीत आहेत. आता हा थरार पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर येणार असून बॉलीवूडचा आवडता अभिनेता रणवीर सिंग कपिल देव यांच्या प्रमुख भूमिकेत आहे.रणवीरसोबतच त्याच्या सोबत काम करणाऱ्या त्याच्या संघमित्रांचीही नावं जाहीर झाली आहेत. आणि रणवीरच्या या संघात वर्णी लागली आहे २ मराठी शिलेदारांची. आदिनाथ कोठारे आणि चिराग पाटील हे २ कलाकार ८३ या फिल्ममध्ये महत्वाच्या भूमिका बजावणार आहेत.आदिनाथ दिलीप वेंगसरकर यांची भूमिका साकारणार आहे. "साक्षात देवासोबत... या महान व्यक्तीला भेटणे आणि त्यांच्यासोबत चर्चा करणे यासारखा कोणता सन्मान असू शकतो का? मी स्वतःला भाग्यवान समजतो" असं कॅप्शन देत आदिनाथने कपिल देव यांच्याबरोबरच एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला.तर दुसरीकडे, चिराग पाटील म्हणजे खुद्द क्रिकेटर संदीप पाटील यांचा मुलगा आपल्या वडिलांचीच भूमिका साकारणार आहे. चिराग म्हणतो "मी खूप उत्सुक आहे.. ८३ चा वर्ल्ड कप हा क्रिकेट विश्वात खूप महत्वाचा मानला जातो आणि मी त्या संघाचा एक भाग होणे हे एखाद्या स्वप्नासारखेच आहे. मला नाही वाटत माझ्यापेक्षा चांगली भूमिका कोणताही दुसरा अभिनेता साकारू शकला असता."८३ या चित्रपटाला कपिल यांचे मार्गदर्शन लाभले असून धर्मशाळा येथे सध्या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. तुम्ही आपल्या लाडक्या कलाकारांना ८३ मध्ये पाहण्यात किती उत्सुक आहेत. कमेन्स्टद्वारे आम्हाला कळवा.खमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप