या भूमिकेसाठी अभिनेता भूषण प्रधानने केले टक्कल!

भूषणला चक्क आपले केस कापून टक्कल करावे लागले. जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पहा.

या भूमिकेसाठी अभिनेता भूषण प्रधानने केले टक्कल! या भूमिकेसाठी अभिनेता भूषण प्रधानने केले टक्कल! Source : Press


अभिनेता म्हंटले की येईल त्या भूमिकेसाठी काहीही करावे लागते. कधी वयापासून लहान दिसावे लागते तर कधी मोठे, कधी बारीक व्हावे लागते तर कधी जाड. असाच प्रसंग आला भूषण प्रधानवर . भूषणला चक्क आपले केस कापून टक्कल करावे लागले. याचा एक व्हिडिओ भूषणने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला. भूषणने आपल्या कॅप्शनमध्ये असे लिहिले की कारण जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पहा.जर तुम्ही हा व्हिडीओ पहिला असेल तर आपल्या लक्षात येईल की भूषण दामोदर नावाच्या भूमिकेसाठी आपले केस कापत आहे. व्यक्तिरेखा ऐतिहासिक असेल यात दुमत नाही कारण याआधी भूषणने चाळीस -पन्नासच्या दशकातील एका वेशभूषेचा फोटो शेअर केला आणि लिहिले-


"२५ जून


आज तुमचा वाढदिवस... तुमची जयंती. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा जन्म चिंचवडचा आणि मी लहानाचा मोठा झालो तो चिंचवड येथेच. लहानपणी बाबांबरोबर स्कूटरवरून फिरताना न चुकता चौकात पोहोचल्यावर मान वर करून तुमच्या पुतळ्याकडे बघायचो. इतिहासाच्या पुस्तकात तुमच्या बद्दल एका धड्यात वाचताना सुद्धा खूप अभिमान वाटायचा. तेव्हा कल्पनाही नव्हती की मोठा झाल्यावर एक दिवस मला तुमची भूमिका साकारायला मिळेल. झी5 साठीची ही web series लवकरच प्रदर्शित होईल. चित्रिकरण अतिशय उत्तम आणि जोमाने सुरु आहे. आज भूमिकेसाठी म्हणून तुमचं आत्मवृत्त वाचताना, तुमच्या बद्दल अजून जाणून घेताना एकच लक्ष्यात येतंय की किती कमी माहित होतं मला तुमच्याबद्दल. तुमची भूमिका योग्यरित्या साकारता यावी म्हणून मी, आमचे निर्माते, दिग्दर्शक आणि अख्खी टीम मनापासून कष्ट घेत आहोत. तुमचे आशिर्वाद आमच्या पाठीशी असूद्यात.
#Zee5Originals @Zee5Premium Coming soon!


भूषणचा हा नवा लुक पाहण्यात प्रेक्षकांना खूप मजा येणार आहे.खमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप