यांना ओळखलंत का? हे आहेत तुमचे आवडते मराठी कलाकार

आम्ही आज तुम्हाला तुमच्या आवडत्या मराठी कलाकारांचे बालपणीचे फोटोस दाखवणार आहोत. पहा ते कसे दिसायचे.

यांना ओळखलंत का? हे आहेत तुमचे आवडते मराठी कलाकार यांना ओळखलंत का? हे आहेत तुमचे आवडते मराठी कलाकार Source : Press


बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा असे नेहमीच म्हटले जाते. किती रम्य होते ते दिवस. मोठे झाल्यावर उरतात त्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या आठवणी. आपण लहानपणी किती गोड दिसतो तसेच तुम्ही कधी विचार केला का की तुमचे आवडते कलाकार लहानपणी कसे बरे दिसत असतील?त्यांचे बालपणीचे फोटोस तुम्ही कधी पाहिलेत का? नाही ना. आम्ही आज तुम्हाला तुमच्या आवडत्या मराठी कलाकारांचे बालपणीचे फोटोस दाखवणार आहोत. पहा ते कसे दिसायचे.१. अमेय वाघ: आत्ताच्या युगाचा चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला अमेय पहा किती गोड दिसतोय. अमेयच्या चेहऱ्यामध्ये फारसा काही बदल झालेला नाही. आणि हो डोळ्यांवरून तुम्ही ओळखलं असेलच.

Amey Wagh२. मुक्ता बर्वे: आता जशी मुक्ता डॅशिंग आहे तशीच ती लहानपणी देखील होती याचा पुरावा म्हणजे हा फोटो. पहा किती गोंडस आणि सुंदर दिसतेय ही चिमुकली मुक्ता.

Mukta Barve३. स्वप्नील जोशी: स्वप्नील जोशी हा सर्वांचाच परिचयाचा. अगदी लहानपणापासून स्वप्नील सर्वांच्या घराघरात पोहोचला तो त्याच्या कृष्णाच्या भूमिकेमुळे. छोटा कृष्ण प्रत्येकालाच भावला आणि स्वप्नील सुपरस्टार झाला.

Swwapnil Joshi४. अपूर्वा नेमळेकर: शेवंताला ओळखलंत का? तुमची लाडकी शेवंता म्हणजेच अपूर्व नेमळेकरचं हे गोड़ हास्य पाहून आपल्या चेहऱ्यावरसुद्धा हसू फुटेल नाही का?

Apurva Nemlekar५. तेजस्विनी पंडित: अभिनयातली शेरनी तेजस्विनी पंडित पहा किती सुरेख दिसतेय. बोलके डोळे आणि फुगीर गाल सर्वांचे लक्ष वेधून घेतेय या फोटो मध्ये.

TYejaswini Panditखमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप