यंदा कर्तव्य आहे? सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण

सखी गोखलेच्या एका फोटोने तिच्या सुव्रतसोबतच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.

यंदा कर्तव्य आहे? सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण यंदा कर्तव्य आहे? सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण Source : Instagram


दिल, दोस्ती, दुनियादारी मधली रेश्मा सगळ्यांना आठवतच असेल. सालस, सुंदर आणि सुग्रण रेश्मा, विवाहित असूनसुद्धा सुजयच्या मनात भरलेली होती. पण तुम्हाला माहीत आहे की रेश्मा म्हणजेच सखी गोखले आणि सुजय म्हणजेच सुव्रत जोशी हे एकमेकांना डेट करत आहेत? त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर सखी आणि सुव्रत नेहमी एकमेकांसोबतचे फोटोस शेअर करत असतात.


सखीचा असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सखीने हा फोटो शेअर केला असून त्यात ती पार्टी मोड मध्ये दिसत आहे. या फोटोकडे बारकाईने पाहिले तर यात तिने एक सॅश घातला असून त्यावरच्या बी या अक्षराने लोकांनी तर्क लावायला सुरुवात केली आहे. बी म्हणजेच ब्राईड-टू-बी असं तिच्या फॅन्सना वाटतंय. यावरूनच सखी लवकरच सुव्रतसोबत लगीनगाठ बांधणार का या चर्चांना उधाण आले आहे.


सुव्रत आणि सखी डी ३ च्या सेटवर पहिल्यांदा एकमेकांना भेटले आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. लेंटाईन डेच्या दिवशी सुव्रतने सखीसाठी टाकलेली पोस्ट पाहिल्यानंतर हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे निश्चित झाले होते. तसेच सखी शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये असल्यामुळे तिने अमर फोटो स्टुडिओ या नाटकातून एक्झिट घेतली होती.अमेय वाघ, शशांक केतकर, आरोह वेलणकर, प्रार्थना बेहेरे अनेक मराठी कलाकार नुकतेच विवाहबंधनात अडकले. आता या सगळ्यांपाठोपाट सखी आणि सुव्रत बोहल्यावर चढणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


खमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप


You may also like