मोगरा फुलला: नव्या अवतारातील स्वप्नील जोशी तुम्ही पाहिलात का ?

जर आपण स्वप्नील जोशीचा मोगरा फुलला या नव्या कोऱ्या सिनेमातला लुक पाहिला तर त्याची चॉकलेट बॉय इमेज थोडी मागे राहील.

मोगरा फुलला: नव्या अवतारातील स्वप्नील जोशी तुम्ही पाहिलात का ? मोगरा फुलला: नव्या अवतारातील स्वप्नील जोशी तुम्ही पाहिलात का ? Source : Twitterस्वप्नील जोशीला नेहमी आपण चॉकलेट हिरोच्या भूमिकेत पाहिले आहे. मग ते मुंबई पुणे मुंबई असो किंवा दुनियादारी, पण जर आपण त्याचा मोगरा फुलला या नव्या कोऱ्या सिनेमातला लुक पाहिला तर त्याची चॉकलेट बॉय इमेज थोडी मागे राहील.

सिने समीक्षक तरण आदर्श यांनी स्वप्निलच्या मोगरा फुलला या सिनेमातला पहिला वहिला लुक आपल्या ट्विटर वर शेअर केला आहे.


"Swwapnil Joshi as Sunil Kulkarni... First glimpse of #Marathi film #MograPhulaalaa... Directed by Shrabani Deodhar... Produced by Arjun Singgh Baran and Kartik Nishandar." असे त्यांनी लिहिले.

Swwapnil Joshi


पहिल्या फोटोमध्ये स्वप्नील लाल स्कूटर वर हेल्मेट घालून बसला आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याने एक काळ्या रंगाची साईड बॅग लावली आहे आणि शर्ट इन केला आहे.


नेहमी कॅज्युअल अवतारात दिसणारा स्वप्नील या लुकमध्ये अधिकच हटके दिसत आहे. आम्हाला खात्री आहे कि प्रेक्षकांनी त्याचा हा अवतार कधीच पाहिला नसावा.


मोगरा फुलला हा सिनेमा श्राबनी देवधर यांनी दिग्दर्शित केला असून अर्जुन सिंग बारन आणि कार्तिक निशानदार हे तो सिनेमा प्रदर्शित करणार आहेत.


कसा वाटला स्वप्नीलचा हा नवा अंदाज? आम्हाला नक्की कळवा तुमच्या कंमेंट्सद्वारे.


Download The Lehren App For Latest & More News, Gossips And Videos.