माधुरी दीक्षित राजकारणात जाणार का? पहा ती काय म्हणते

अभिनेत्री माधुरी दीक्षित ही सुद्धा भारतीय जनता पार्टी कडून निवडणूक लढवणार आहे अश्या चर्चांना उधाण आले आहे. पहा ती काय म्हणते

माधुरी दीक्षित राजकारणात जाणार का? पहा ती काय म्हणते माधुरी दीक्षित राजकारणात जाणार का? पहा ती काय म्हणते Source : Inhouse


सध्या राजकारण विश्वात बरीच खळबळ माजली आहे. एकीकडे निवडणूक तोंडावर आली आहे तर दुसरीकडे तिकीट मिळवण्याची धडपड चालू आहे. अश्यातच अनेक कलाकार आपले नशीब अजमावण्यासाठी राजकारणात प्रवेश करत आहेत. उर्मिला मातोंडकरने काँग्रेसमध्ये प्रवेश करत आपले तिकीट पक्के केले असून, अभिनेत्री माधुरी दीक्षित ही सुद्धा भारतीय जनता पार्टी कडून निवडणूक लढवणार आहे अश्या चर्चांना उधाण आले आहे.


या अफवांना मोडीत काढत माधुरी म्हणते "मी कोणत्याही राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवणार नाही. मी आधीच या विषयावर माझे मत स्पष्ट केले आहे. मला असे वाटते की अभिनय क्षेत्रातील कलाकारांविषयी लोक अफवा पसरवत आहेत. त्यामुळेच या विषयावर मी आधीच माझे मत स्पष्ट केले आहे."


माधुरीच्या या विधानाने असे स्पष्ट होते की सध्या तिला राजकारणात नाही.


माधुरी करण जोहरच्या आगामी कलंक या चित्रपट दिसणार असून, तिच्यावर एक गाणेही चित्रित करण्यात आले आहे. कलंक चित्रपटातील पहिलं गाणं घर मोरे परदेसीया मध्ये आलिया भट्ट आणि तिची सांगीतिक जुगलबंदी पाहायला मिळाली. पण प्रेक्षकांना माधुरीचा डान्स बघण्याची प्रचंड उत्सुकता आहे.


माधुरी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत असून तिचा १५ ऑगस्ट हा चित्रपट आजच प्रदर्शित झाला आहे. नेटफ्लिक्स वर हा चित्रपट सगळ्यांना पाहता येईल.खमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप