बिग बॉस मराठी २: हीना म्हणते किशोरी माझ्यासोबत डबल गेम खेळत होती

बिग बॉस मराठी २ च्या घरातून हीना पांचाळ बाद झाली असून तिने फेसबुक लाईव्ह दरम्यान प्रेक्षकांशी संवाद साधला

बिग बॉस मराठी २: हीना म्हणते किशोरी माझ्यासोबत डबल गेम खेळत होती बिग बॉस मराठी २: हीना म्हणते किशोरी माझ्यासोबत डबल गेम खेळत होती Source : Press


बिग बॉस मराठी २ च्या घरातून हीना पांचाल गेल्या आठवड्यात बाद झाली. टास्क असो नाहीतर इतर काही, हीना नेहमीच एक स्ट्रॉंग दावेदार म्हणून ओळखली जायची. पण कमी वोट मिळाल्यामुळे तिला घरातून बाहेर जावे लागले.


बाद झाल्यावर फेसबुक लाईव्ह करताना हीनाला अनेक प्रश्न विचारण्यात आले. एका प्रेक्षकाने तुझ्यासोबत डबल गेम कोण खेळत होतं असं विचारल्यावर तिने किशोरी शहाणेचं नाव घेतलं. पाहायला गेलं तर हीना आधी नेहाच्या ग्रुप मध्ये होती आणि नंतर ती वीणा आणि किशोरीच्या ग्रुप बरोबर खेळू लागली.


टॉप ३ मध्ये कोणाला पाहतेस असं विचारल्यावर हीनाने शिव ठाकरे, वीणा जगताप आणि नेहा शितोळेचं नाव घेतलं. वीणा बद्दल बोलताना हीना म्हणते की "वीणा माझ्या लहान बहिणीसारखी होती. घरात अत्यंत लाडावलेली पण मनात काहीही न ठेवणारी. मी तिचं मन जिंकलंय. मला माहित होत कि मी घरातून बाहेर जाईन तेव्हा एकटी वीणाच माझ्यासाठी रडेल आणि तसंच झालं."


हीना असंही म्हणाली की माझ्याबदली आरोह घरातून बाहेर जायला हवा होता. सतत कम्प्लेंट करत असायचा तो. एकाला कोणाला सेफ करायची पॉवर मिळाली असती तर कोणाला केलं असतं असं विचारल्यावर हीना, वीणा आणि नेहाचं नाव घेते.