बिग बॉस मराठी २: हीना पांचालची एक चूक तिला थेट नॉमिनेशन मध्ये घेऊन जाणार

हीना पांचालची एक छोटीशी चूक तिला महागात पडली असून, बिग बॉसने तिला थेट नॉमिनेशन मध्ये टाकले आहे.

बिग बॉस मराठी २: हीना पांचालची एक चूक तिला थेट नॉमिनेशन मध्ये घेऊन जाणार बिग बॉस मराठी २: हीना पांचालची एक चूक तिला थेट नॉमिनेशन मध्ये घेऊन जाणार Source : Press


रुपाली भोसलेच्या एलिमिनेट होण्याने बिग बॉस मराठी २ च्या घरातील समीकरणे जरी बदलली असली तरी, The show must go on म्हणत इतर सदस्य आता फायनल मध्ये धडक मारण्यासाठी अत्यंत मेहनतीने प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणजे काल झालेले कॅप्टन्सी कार्य. बिग बॉसने घरातील सर्वच सदस्यांना कॅप्टन होण्याचा चान्स दिला आणि त्यासाठी 'खांब खांब' हे कॅप्टन्सी कार्य त्यांच्यावर सोपवले. रुपालीने जाता जाता हीनाला सेफ केल्यामुळे ती ह्या कार्याची संचालक होती. 


विविध रंगांच्या खांबांवर आपल्या नावाचे स्टिकर चिकटवायचे होते आणि जो शेवट पर्यंत राहील तो कॅप्टन असेल असा साधारणपणे तो टास्क होता. आरोह वेलणकर आणि शिव ठाकरे यांच्या मध्ये थोडी हातापायी झाली म्हणून हीनाने दोघांनाही बाद केले. त्यानंतर किशोरी आणि वीणा मध्ये सुद्धा थोडी झटापट झाली आणि हीनाने त्यांना सुद्धा बाद केले. 


  
बिग बॉसने वारंवार विचारल्यावर हीना आपला निर्णय बदलत राहिली आणि म्हणून बिग बॉसने तिला थेट नॉमिनेशन मध्ये टाकले आहे. तुम्हाला काय वाटते? बिग बॉसचा हा निर्णय योग्य आहे का? कॉमेंट्सद्वारे जरूर कळवा.