बिग बॉस मराठी २: शिव आणि वीणाचे गोवा प्लॅन्स

बिग बॉस मराठी २ चं राजा-राणी कपल शिव ठाकरे आणि वीणा जगताप फिनाले नंतर गोव्याला जायचे प्लॅन्स करत आहेत.

बिग बॉस मराठी २: शिव आणि वीणाचे गोवा प्लॅन्स बिग बॉस मराठी २: शिव आणि वीणाचे गोवा प्लॅन्स Source : Press


बिग बॉस मराठी २ च्या फिनालेसाठी आता काहीच दिवस बाकी राहिले आहेत. १ सप्टेंबर ला आपल्याला महाविजेता किंवा महाविजेतीचं नाव कळेल. पण त्याआधीच शिव ठाकरे आणि वीणा जगताप या दोघांनी पुढे काय करायचं याचं planning करायला सुरुवात केली आहे.


एक क्लिप मध्ये शिव आणि वीणा गोव्याला जायचे प्लॅन्स करताना दिसतात. गणपती वैगरे सगळं झाल्यावर १५ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर यादरम्यान शिव आणि वीणा गोव्याला जाणार आहेत.


शिव या आधी कधी गोव्याला गेला नाही असं म्हणतो, त्यावर वीणा त्याला सांगते की ती खूप वेळा गोव्याला गेली आहे त्यामुळे कुठे आणि कसं फिरायचं हे तिला माहित आहे.


तर वरील दिलेल्या तारखांमध्ये जर आपण गोव्याला असाल आणि गोव्याच्या किनाऱ्यावर तुम्हाला बिग बॉसचं हे राजा-राणी कपल मजा-मस्ती करताना दिसलं तर आश्चर्यचकित होण्याची काहीच गरज नाही.


आणि हो, आपल्या आवडत्या व्यक्तीला वोट करताय ना? आम्हालासुद्धा कॉमेंट्स करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा.