बिग बॉस मराठी २ विजेता शिव ठाकरेचा वाढदिवस दणक्यात साजरा होणार

बिग बॉस मराठी २ चा विजेता शिव ठाकरे आज आपला वाढदिवस वीणा जगताप सोबत साजरा करणार आहे.

बिग बॉस मराठी २ विजेता शिव ठाकरेचा वाढदिवस दणक्यात साजरा होणार बिग बॉस मराठी २ विजेता शिव ठाकरेचा वाढदिवस दणक्यात साजरा होणार Source : Inhouse


बिग बॉस मराठी २ चा विजेता शिव ठाकरे आज त्याचा वाढदिवस साजरा करणार आहे. बिग बॉस च्या दुसऱ्या पर्वात अमरावतीचा शिव ठाकरे सहभागी झाला. रोड़ीज या हिंदी रिऍलिटी शोच्या सेमी-फायनल मध्ये जाऊन शिवला हार पत्करावी लागली. पण अमरावतीचा हा पट्ठ्या बिग बॉस मधून विजेती ट्रॉफी घेऊनच घरी परतला.


अगदी दोन दिवसापूर्वी शिव आणि त्याची राणी वीणा जगताप हे दोघे अमरावतीला शिवच्या घरी गेले. वीणा शिव च्या आईंना आणि त्याच्या बहिणीला म्हणजेच मनीषा ताईला सुद्धा भेटली. वीणा त्यांना पसंत आहे असं देखील म्हंटल जात आहे.


वीणाने इंस्टाग्रामवर शिव आणि तिचा एकत्रित फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या आहेत. असं म्हंटल जातंय की शिवचा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा होणार आहे.


काही दिवसांपूर्वी शिव आणि वीणा आपल्या दादा ताईला म्हणजेच वैशाली माडे आणि अभिजीत केळकर यांना भेटले होते. त्यांच्यासोबत हीना पांचाळसुद्धा होती.


पुढील वाटचालीसाठी शिवला आमच्यातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.