बिग बॉस मराठी २: रुपाली भोसले म्हणते अभिजीत आणि नेहा आहेत मास्टरमाईंड

बिग बॉस मराठी २ च्या घरातून रुपाली भोसले बाहेर पडली असून, घरातल्या २ मास्टरमाईंड लोकांची नावे तिने सांगितली आहेत

बिग बॉस मराठी २: रुपाली भोसले म्हणते अभिजीत आणि नेहा आहेत मास्टरमाईंड बिग बॉस मराठी २: रुपाली भोसले म्हणते अभिजीत आणि नेहा आहेत मास्टरमाईंड Source : Press


बिग बॉस मराठी २ चा कालचा भाग धक्का देणारा ठरला. रुपाली भोसले एलिमिनेट झाली असून तिचे घरातून जाणे सर्वांनाच आश्चर्य वाटणारे ठरले. अगदी पहिल्या दिवसापासूनच रुपाली फायनल पर्यंत जाणार असा लोकांचा समज होता. इतकच काय तर रुपालीने सुद्धा आपल्या पद्धतीने गेम खेळून आपले स्थान फायनल मध्ये जवळ जवळ निश्चित केले होते.


शिव ठाकरे, पराग कान्हेरे, किशोरी शहाणे आणि रुपाली भोसले हि चौकडी बिग बॉस च्या घरात इतकी फेमस झाली की लोक बाहेर त्यांच्या मैत्रीचे दाखले देऊ लागले. पण मधल्या काळात झालेल्या वादामुळे त्यांच्यात फूट पडली. पराग घराबाहेर गेला आणि त्या नंतर वीणा आणि रुपाली मध्ये वाद होत गेले. शेवटी वीणाने सांगितले कि ती एकटीच खेळतेय.


तेव्हा रुपाली नेहा च्या ग्रुप ला जाऊन मिळाली आणि तिथेच तिचं चुकले. महेश मांजरेकरसुद्धा म्हणाले कि रुपालीचं confusion तिला महागात पडलं. तिचे गेम प्लॅन्स कुठेतरी फसत गेले आणि म्हणून ती घराबाहेर गेली.


वुट बिग चर्चा मध्ये बोलताना रुपाली म्हणाली की अभिजीत केळकर आणि नेहा शितोळे बिग बॉसचे Mastermind आहेत. तसेच घरातल्या अनेकांना तिने थोडेफार सल्ले सुद्धा दिले.