बिग बॉस मराठी २: रुपाली भोसलेने हीना पांचालला खडसावले

हीना पांचाल आणि रुपाली भोसले मध्ये वाद झाला आणि तोही पुन्हा पोळी वरूनच.

बिग बॉस मराठी २: रुपाली भोसलेने हीना पांचालला खडसावले बिग बॉस मराठी २: रुपाली भोसलेने हीना पांचालला खडसावले Source : Press


मर्डर मिस्टरी या साप्ताहिक कार्याने बिग बॉस मराठी २ च्या घरात चांगलीच रंगात आणली. एकीकडे नेहा शितोळे आणि शिवानी सुर्वे बाकी सदस्यांचे सांकेतिक खून करण्यात व्यस्त होते तर दुसरीकडे टास्क संपताच २ सदस्यांमध्ये भांडण झालेले दिसले.


रुपाली भोसले आणि हीना पांचाल एकमेकांसोबत भिडल्या आणि घराला जणू आखाड्याचेच स्वरूप आलेले दिसले. विशेष म्हणजे हीना आणि रुपालीचा वाद पुन्हा पोळी वरूनच झाला.


हीनाने नेहाला तिला एक पोळी हवी असल्याचं सांगितलं, त्यावर कॅप्टन रुपालीने हीनाला तिची ड्युटी केली का हे विचारलं. रुपाली म्हणाली की, ‘मी तुला सांगितले होते की घासलेली भांडी लावायची.. ओटा स्वच्छ करायचा' त्यावर हीनाने आपण भांडी घासली असल्याचे सांगितले. जेव्हा रुपाली म्हणाली कि सकाळची भांडी किशोरी ताईने घासली तेव्हा हीनाचा आवाज चढला आणि रुपाली तिला म्हणाली कि "माझ्याशी हळू आवाजात बोल. मी तुझी नोकर नाहीये."


रुपाली आणि हीना मध्ये वाद सुरु असतानाच नेहा मधे बोलली आणि मग हीना आणि नेहा मध्ये वाद सुरु झाला.


अभिजीत केळकर सीक्रेट रूम मधून बाहेर आला असून आपल्या टीमची त्याने चांगलीच शाळा घेतली.


आजचा भाग चांगलाच रंगतदार असून महेश मांजरेकरांच्या प्रश्नांना सदस्यांना सामोरे जावे लागेल.


खमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप