बिग बॉस मराठी २: मेघा धाडे म्हणते शिव आणि किशोरी व्हावेत विनर

बिग बॉस मराठी १ ची विजेती मेघा धाडे आता बिग बॉस मराठी २ ला रिव्यू करतेय आणि घरातल्या सदस्यांबद्दल तिचे मत मांडतेय.

बिग बॉस मराठी २: मेघा धाडे म्हणते शिव आणि किशोरी व्हावेत विनर बिग बॉस मराठी २: मेघा धाडे म्हणते शिव आणि किशोरी व्हावेत विनर Source : Press


बिग बॉस मराठी २ चा फिनाले अगदी ३ दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि कालच्या भागात टॉप ६ फायनॅलिस्टसना त्यांची आतापर्यंतची जर्नी  ए व्ही मधून दाखवण्यात आली. सर्वच सदस्य भावुक झाले पण शिव आणि किशोरी हे जास्त भावुक झाले.


बिग बॉस मराठी १ ची विजेती मेघा धाडे आता बिग बॉस मराठी २ ला रिव्यू करतेय आणि घरातल्या सदस्यांबद्दल तिचे मत मांडतेय. मेघा म्हणते की "हा सीझन आमच्या सीझनपेक्षा खूप वेगळा आहे. प्रेक्षकांचा सुरुवातीला गोंधळ झाला कारण प्रत्येक जण या सदस्यांमध्ये आस्ताद, मेघा, स्मिता यांना शोधत होते. हेच मूळ टाळायला हवं."


शिवानी सुर्वे बद्दल बोलताना मेघा म्हणते "शिवानीचं खेळणं नाही आवडलं मला. खूप ठिकाणी तिने मला डिसपोइन्ट केलं. बघताना बऱ्याच गोष्टींचा राग आला, पण बाहेर आल्यावर तिची आणि माझी चर्चा झाली आणि तिने सांगितलं की ती अड्जस्ट न्हवती होत. खऱ्या आयुष्यात शिवानी खूप प्रेमळ आहे आणि परत घरात गेल्यावर तिच्यात मला प्रगती झालेली दिसली."


विनर कोणाला होताना बघायला आवडेल असं विचारल्यावर मेघा म्हणते की "किशोरी ताई आणि शिव ठाकरे खूप डीझर्व्ह करतात ती ट्रॉफी. मला त्या दोघांपैकी कोणाला ही जिंकलेलं पाहायला आवडेल. "