बिग बॉस मराठी २: मेघा धाडे आणि रेशम टिपणीस बिग बॉसच्या घरात जाणार?

बिग बॉस मराठी २ च्या घरात बिग बॉस १ ची विजेती मेघा धाडे आणि सदस्य रेशम टिपणीस एन्ट्री घेणार आहेत.

बिग बॉस मराठी २: मेघा धाडे आणि रेशम टिपणीस बिग बॉसच्या घरात जाणार? बिग बॉस मराठी २: मेघा धाडे आणि रेशम टिपणीस बिग बॉसच्या घरात जाणार? Source : Press


बिग बॉस मराठी २ च्या घरातून अभिजीत केळकर एलिमिनेट झाला आणि सर्वांना धक्का बसला. अभिजीत सुरुवातीच्या काळापासून एकदाही नॉमिनेशन मध्ये आला न्हवता आणि ज्यावेळी आला त्यावेळी थेट घराबाहेरच गेला.


वीकेंडच्या वार मध्ये भाईजान सलमान खानने जान आणली आणि आता मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉस १ ची विजेती मेघा धाडे आणि सदस्य रेशम टिपणीस बिग बॉस मराठी २ च्या घरात जाणार आहेत. घरातल्या सदस्यांबरोबर त्या दोघी टास्कसुद्धा खेळणार आहेत.


बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्क अनाऊन्स झाला आणि शिव ठाकरे आणि किशोरी शहाणे यावेळी कॅप्टन पदाचे दावेदार आहेत. म्हातारीचा बूट या कार्याअंतर्गत कॅप्टन निवडला जाईल.


घरात मेघा आणि रेशमची एन्ट्री झाली तर सदस्यांमध्ये काय फरक पडेल? मेघा आणि रेशम, सदस्यांना काय टिप्स देतील? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा.